- नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला शासन मदत करणार
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेत्री स्वाती चिटणीस (Swati Chitnis) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, “नाट्य परिषदेचे काम कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देणे यासाठी मराठी नाट्य परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रम 'नाट्यकला अकादमी' सांस्कृतिक विभाग तन, मन आणि धनाने ठामपणे पाठिंबा देईल व सोबत काम करेल. बेस्टच्या काही आगारांमध्ये नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उभारण्याचा आमचा मानस आहे”. तसेच महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन पातळीवर विडंबन केल्याप्रकरणी ई-कॉमर्स ...
रंगभूमी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रंगभूमीच्या सगळ्या माध्यमांची मुशाफिरी करता आली याचा आनंद आहे. माझी जडणघडण रंगभूमीमुळेच झाली; मी घडलो तो रंगभूमीमुळे या पुरस्कारात माझ्या सहकलाकारांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, तसेच पुरस्कारही काहीतरी देऊन जातो. भूमिका माणसाला डोळस बनवते, तर पुरस्कार विनम्र बनवतो. अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केली.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभाग, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाट्य परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय गोखले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला होती.
कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते "मर्म बंधातली ठेव ही" या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. स्वरगंधर्व मा. दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती देण्यात आली. तसेच स्वरस्वामिनी आशा भोसले यांना संगीतबद्ध आदरांजली वाहण्यात आली.
Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट देखील त्या ...
मराठी रंगभूमीच्या जतन - संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाला नाट्यप्रेमी, कलावंत आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलावंतांचा गौरव आणि नाट्यसंगीताच्या सुवर्ण परंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
या कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर , शिवाजी शिंदे, विजय सूर्यवंशी व परिषदेच्या इतर कार्यकर्त्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





