मुंबई, : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) कायम राहणार आहेत.
सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांना ...
उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाहतुकीचे प्रभावी नियोजन आणि महसूलवाढीच्या उद्देशाने महामंडळाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जून २०२६ रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा विचार करता तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षात घेऊन या निर्णयास मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 : पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा ...
या निर्णयानुसार साधी व मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये कायम राहणार असून, किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये असेच राहील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.






