Monday, June 15, 2026

America Plane Crash : अमेरिकेत विमान भीषण दुर्घटना; स्कायडायव्हिंग विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू

America Plane Crash : अमेरिकेत विमान भीषण दुर्घटना; स्कायडायव्हिंग विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू
अमेरिका : अमेरिकेतील मिसौरी (Missouri) राज्यात रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात (Plane crash) 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही दुर्घटना बटलर मेमोरियल विमानतळ (Butler Memorial Airport) जवळ घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 स्कायडायव्हर्स आणि एका पायलटचा समावेश असल्याची माहिती स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. बटलर हे शहर कॅन्सस सिटीच्या दक्षिणेस सुमारे 60 मैल अंतरावर आहे. अपघातानंतर आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमान पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे बचावकार्याला मर्यादा आल्या आणि कोणालाही वाचवता आले नाही. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणते कारण या अपघातामागे आहे का, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास  फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration) (FAA) आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ (National Transportation Safety Board (NTSB) यांच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेमागील खरे कारण समोर येणार आहे. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >