पश्चिम आशियाला गेल्या १०७ दिवसांपासून हादरवून सोडणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठी घडामोड झाली आहे. दोन्ही देशांनी ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या फ्रेमवर्कवर सहमती दर्शवली असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या १९ जून म्हणजेच शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये ऐतिहासिक करारावर औपचारिक स्वाक्षरी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या महत्त्वपूर्ण कराराची घोषणा केली. (Iran - America War Peace Agreement)
जागतिक ऊर्जा बाजारावर सकारात्मक परिणाम :
या कराराचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसून आला आहे. युद्धामुळे धोक्यात आलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून, या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तब्बल ५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजीची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Iran - America War Peace Agreement)
http://prahaar.in/2026/06/14/narendra-modi-innovation-is-in-indias-dna/पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्वप्रथम या युद्धविराम फ्रेमवर्कची माहिती दिली. दोन्ही देशांनी लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शवली असून, आता आण्विक मुद्यांवरील चर्चेला गती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Iran - America War Peace Agreement)
मात्र, युद्धबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी १९ जूननंतर होणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझ परिसरात लावलेली स्फोटके हटवली जातील आणि त्यानंतर हा मार्ग पूर्णपणे खुला केला जाईल. (Iran - America War Peace Agreement)
नवी दिल्ली : पाश्चात्य देशांचे भू-राजकीय दबाव आणि निर्बंध झुगारून भारताने रशियाकडून जीवाश्म इंधनाची मोठी खरेदी सुरूच ठेवली आहे. युरोपियन थिंक टँक ...






