São Paulo: ब्राझीलमधील साओ पाऊलो राज्यातील लाइमेइरा परिसरात बंजी जंपिंग (ब्रिज जंपिंग) करताना एका २१ वर्षीय तरुणीचा ४० मीटर (सुमारे १३० फूट) उंचीवरून पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून, पर्जन्यमानात घट ...
नेमकी घटना काय?
मृत तरुणीचे नाव मारिया एडुआर्दा रोड्रिग्ज डी फ्रेटास असे आहे. मारिया बंजी जंपिंगचा आनंद घेण्यासाठी ब्रिज जंपिंग साइटवर पोहोचली होती. मात्र, साहसी खेळाच्या उत्साहाच्या भरात संबंधित कर्मचाऱ्यांनी तिच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेला ‘सेफ्टी रोप’ (सुरक्षा दोर) बांधायलाच विसरले. या भीषण निष्काळजीपणामुळे, तरुणीला उडी मारण्यासाठी उंचावरून फेकले असता, ती थेट जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
- सुहास शेलार पुस्तकाचे नाव : राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती - २०१४ ते २०२६ प्रकाशक - महाराष्ट्र प्रदेश भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
व्हिडिओतून समोर आला भयानक प्रकार
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणीची तयारी सुरू आहे आणि काही क्षणातच तिला उडी मारण्यासाठी सोडले जाते. तिला सोडताच कर्मचाऱ्यांना आपली चूक लक्षात येते आणि ते ओरडतात, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
एक भूल। अगले पल दर्दनाक मौत। मंजर देख दिल दहल जाएगा। 21 साल की लड़की को Bungee jump कराते समय कर्मचारी सेफ्टी रस्सी लगाना भूले। ब्रिज से नीचे फेंका। लड़की की मौत। 6 गिरफ्तार। सनसनीखेज घटना ब्राजील के साओ पोलो का लाइमीरा (Limeira) शहर की। इस शहर का स्केलेटन ब्रिज" Skeleton… pic.twitter.com/O16JJC7AJL
— Sunil Maurya (@smaurya_journo) June 14, 2026
भावी पती आणि कुटुंबियावर दु:खाचा डोंगर
मारियाचा अलीकडेच साखरपुडा झाला होता आणि तिचा भावी पतीही त्या ठिकाणी उपस्थित होता. डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण घटनेमुळे तो इतका हादरला की, त्याला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. मारियाने या दुर्घटनेपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत "कोण पुलावरून उडी मारायला सांगतंय?" असे मजेशीर कॅप्शन दिले होते, जे आता तिचे शेवटचे क्षण ठरले आहेत.
कायदेशीर कारवाई
या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ६ जणांना अटक केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे इतके मोठे उल्लंघन कसे झाले आणि याला नेमके कोण जबाबदार आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या दुर्घटनेनंतर बंजी जंपिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.






