परदेशी शिक्षण महागलं! घसरत्या रुपयामुळे विद्यार्थ्यांची कोंडी

अमेरिकन डॉलर आणि इतर जागतिक चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले आहे.
दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र, सध्या परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर एक मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. गेल्या एका वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशी शिक्षणाचा प्रवास अत्यंत महागडा झाला असून पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.




रुपया केवळ डॉलरच्या तुलनेत घसरला नाही. तर आशियातील सर्वात कमजोर चलन ठरले आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील इतर प्रमुख देशांच्या चलनांच्या तुलनेतही रुपया कोसळला आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांना पैसे पाठवताना पालकांची आर्थिक ओढाताण होत आहे. ‘युनिव्हर्सिटी लिविंग’चे संस्थापक आणि सीईओ सौरभ अरोरा यांच्या मते, रुपयाच्या घसरणीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक खर्चात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करायला वर्षाला ३५ ते ७० लाख रुपये खर्च होता, तिथे आता अतिरिक्त ४ ते ८ लाख रुपये जास्त मोजावे लागत आहेत. ‘वनस्टेप ग्लोबल’चे संचालक स्टीफन रोच यांच्या विश्लेषणानुसार, दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवीसाठी ५० ते ६० लाख रुपयांचे बजेट ठेवलेल्या विद्यार्थ्यांना आता कोणतीही शुल्कवाढ झाली नसताना, ५ ते ७ लाख रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

Comments
Add Comment

Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये

Sugar Price Hike : साखर उत्पादनात मोठी घट; दरवाढीने ग्राहकांना फटका, सरकारने सांगितली ‘ही’ कारणे

नवी दिल्ली : चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

PM Awas Yojana 2.0 : ₹२५ लाखांपर्यंत होमलोन, व्याजावर ४% सवलत; घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी योजना

नवी दिल्ली : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची योजना राबवली जात आहे.

Tata Sons AGM adjourned due to lack of quorum : टाटा सन्सची बैठक अचानक रद्द; उद्योगविश्वात चर्चेला उधाण

मुंबई : भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी उद्योग समूह असलेला टाटा सन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा

Gold-Silver Price 18 August 2026 : आनंदवार्ता! सोने - चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन भाव

मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात