Wimbledon Championships 2026 : विम्बल्डन विजेत्यांवर पैशांचा वर्षाव! चॅम्पियनला मिळणार तब्बल ४६ कोटी रुपयांचे बक्षीस

टेनिसविश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डनने (Wimbledon Championships 2026) यंदा बक्षीस रकमेत विक्रमी वाढ जाहीर करत खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. २०२६ हंगामासाठी स्पर्धेच्या एकूण पारितोषिक रकमेत तब्बल २० टक्क्यांची वाढ करण्यात आली असून पुरुष आणि महिला एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ३.६ दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ४६ कोटी रुपये मिळणार आहेत. विम्बल्डनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वार्षिक बक्षीसवाढ मानली जात आहे.


यंदाच्या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६४.२ दशलक्ष पौंड (सुमारे ८५० कोटी रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम १०.७ दशलक्ष पौंडांनी अधिक असून स्पर्धेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि आर्थिक यशामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. (Wimbledon Championships 2026)


विशेष म्हणजे, केवळ विजेत्यांनाच नव्हे तर स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही या वाढीचा मोठा फायदा होणार आहे. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंनाही ८० हजार पौंडांचे बक्षीस मिळणार आहे. पात्रता फेरीतील खेळाडूंसाठीही बक्षीस रकमेत २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून खालच्या क्रमांकावरील खेळाडूंनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Wimbledon Championships 2026)



मात्र, बक्षीस रकमेत मोठी वाढ जाहीर झाल्यानंतरही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे आयोजक आणि खेळाडू यांच्यातील महसूल वाटपाचा मुद्दा अद्याप कायम आहे. अनेक आघाडीच्या खेळाडूंनी स्पर्धांच्या वाढत्या उत्पन्नाच्या तुलनेत खेळाडूंना अधिक वाटा मिळावा, अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे. त्यांचे मत आहे की, ग्रँडस्लॅम स्पर्धांमधून निर्माण होणाऱ्या अब्जावधी रुपयांच्या उत्पन्नात खेळाडूंचा हिस्सा अधिक असायला हवा. (Wimbledon Championships 2026)


या पार्श्वभूमीवर विम्बल्डनच्या अध्यक्षा डेबी जेव्हन्स (Debbie Jevans) यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विम्बल्डन स्पर्धा नफा कमावण्याच्या उद्देशाने चालवली जात नाही. स्पर्धेतून मिळणाऱ्या निधीचा मोठा भाग टेनिसच्या विकासासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च केला जातो. (Wimbledon Championships 2026)



दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या विम्बल्डन २०२६ स्पर्धेकडे जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे. विक्रमी बक्षीस रक्कम, अव्वल खेळाडूंची उपस्थिती आणि प्रतिष्ठेच्या किताबासाठी होणारी चुरस यामुळे यंदाचा विम्बल्डन हंगाम अधिक रंगतदार ठरणार असल्याची चर्चा टेनिस वर्तुळात सुरू आहे. (Wimbledon Championships 2026)

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील