The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बैलजोड्यांनाच देण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.दरम्यान, देहूगाव ते चिंचोळी येथील पादुका मंदिरापर्यंत पालखी रथास स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोडीला जुंपण्याचा मान द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी मधुकर काळोखे यांनी संस्थानकडे अर्जाद्वारे केली आहे. या मागणीमुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली होती.


मात्र, संस्थानने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत पालखी रथासाठी संस्थानने स्वतः खरेदी केलेल्या बैलजोड्याच वापरण्यात येतील, असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान संस्थानच्या बैलजोड्यांनाच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या सोहळ्यातील प्रत्येक मान आणि परंपरेला विशेष महत्त्व असल्याने अशा विषयांबाबत वारकरी आणि भाविकांमध्ये उत्सुकता असते.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या