Khan Sir Controversey : खान सरांच्या कोचिंग सेंटरची तोडफोड करणाऱ्या आरोपीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : बिहारमधील पाटणा येथील सुप्रसिद्ध शिक्षक रोशन आनंद सर आणि खान सर यांच्यातील सुरू असलेला वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या वादामुळे ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद सध्या तुरुंगात आहेत. अनेक दिवसांपासून अटकेच्या धोक्याचा सामना केल्यानंतर खान सरांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या वादाच्या दरम्यान नेपाळमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स याचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्सवर आरोप होता.


खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्स हा देखील एक आरोपी होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रिन्स आपल्या सहा-सात मित्रांसोबत नेपाळमध्ये राहत होता. काल रात्री उशिरा संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोशन आनंद सरांचे कुटुंब नेपाळमध्ये दाखल होत आहे. २०२१ मध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्सवरही आरोप होता.नेपाळमधील एका हॉटेलमध्ये रोशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इतर तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा' कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री