Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या कार्यक्रमात कथित असंवेदनशील टिप्पणी केल्याप्रकरणी समय रैना यांच्यासह अन्य चौघांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. ( Samay Raina )


सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रैना आणि इतर आरोपींनी न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन केल्याची नोंद घेत खंडपीठाने त्यांच्याविरोधातील फौजदारी खटले रद्द केले.


यापूर्वी न्यायालयाने रैना आणि इतरांना दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासह निधी उभारण्याचे निर्देश दिले होते. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नुकसानभरपाईबाबत दिलेल्या हमीचे पालन न केल्याबद्दल रैनावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच रैना आणि इतर चौघांना 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. ( Samay Raina Supreme Court)



शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने दिव्यांग व्यक्तींच्या फायद्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रैना आणि इतरांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सकारात्मक दिशेने काम करण्यास सुरुवात केल्यास त्याचे चांगले परिणाम निश्चितपणे दिसून येतील, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.


‘क्युर एसएमए इंडिया फाऊंडेशन’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रैनाने स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीच्या उपचाराच्या वाढत्या खर्चाबाबत असंवेदनशील टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. तसेच या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची खिल्ली उडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. (Disability Comment Controversy)


या प्रकरणात रैनासोबत विपुन गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत जगदीश तन्वर यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’मधील संबंधित भाग नोव्हेंबरमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यानंतर कथित अश्लील आणि असंवेदनशील वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च