हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला अत्यंत कठोर शब्दांत स्पष्ट संदेश दिला आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, मानवतेच्या आणि शांततेच्या विरोधात उभ्या असलेल्या शक्तींना सिंधू नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत मिळू दिले जाणार नाही. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” ही भारताची ठाम भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. (Defence Minister Rajnath Singh)
Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य प्रदेशातील इंदौर (Indoor) येथे झालेल्या भीषण ...
‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख; शत्रूंना कठोर संदेश :
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू केली. केंद्रीय संस्थेच्या पथकांनी ...
भारताची जागतिक भूमिका आणि संरक्षणशक्ती :
राजनाथ सिंह यांनी भारताच्या जागतिक प्रतिमेवरही प्रकाश टाकला. कोरोना महामारीच्या काळात भारताने जगभरात लस आणि औषधांचा पुरवठा करून मानवतेची सेवा केली, याचा त्यांनी उल्लेख केला. त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की, जसा भारत जगासाठी विश्वासू भागीदार म्हणून उभा आहे, तसाच देश आपली सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताकडे जीवन वाचवणाऱ्या लसींसोबतच शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. (Defence Minister Rajnath Singh)




