अभिनयाचा मुसाफिर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 

पंकज विष्णू सध्या अभिनयाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. ‘श्री बाबा नीब करोरी महाराज' या हिंदी चित्रपटात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत वेगळ्याच गेटअपमध्ये त्याची उद्योजकाची भूमिका आहे. तर कलर्स वाहिनीवरील 'नागीण ७' या मालिकेत देखील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती.पंकजचे शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झाले. शाळेतील स्नेहसंमेलनात त्याने भाग घेतला होता. पंकजचे वडील लेखक, दिग्दर्शक होते.त्यामुळे त्यांच्याकडून त्याला अभिनयाच्या बाबतीत प्रोत्साहन मिळाले. लहानपणी त्याने अनेक बालनाट्य शिबिरामध्ये कामे केली. त्यानंतर लेखक रत्नाकर मतकरीच्या व्यावसायिक नाटकात कामे केली.
माटुंग्याच्या व्ही. जे. टी.आय.मधून त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. के. जे. सोमय्या कॉलेजमधून त्याने इंजिनीअरिंगची डिग्री घेतली. त्याचवेळी त्यांने दूरदर्शनवरील सांगाती, दामिनी मालिकेमध्ये काम केले. त्यानंतर त्याने रणांगण हे नाटक केले व पूर्ण वेळ अभिनय हा व्यवसाय स्वीकारला. चार दिवस सासूचे, पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये काम केले. दोन्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. बिग बुल, मोहरे या वेब सीरिजमध्ये त्याने काम केले. घुमर चित्रपटात त्याला महानायक अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली.

'श्री बाबा नीब करोरी महाराज' हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये त्याची मुख्य भूमिका आहे. श्री बाबा नीब करोरी महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले. नैनिताल येथील कैचीधाम येथे त्यांचा खूप मोठा आश्रम आहे. फेसबुकचे सी. ई. ओ. मार्क झुकेरबर्ग, क्रिकेटर विराट कोहली हे त्यांचे भक्त आहेत. भगवान श्री रामाची भक्ती केलेले आणि हनुमानाचे अवतार अशी त्यांची ख्याती आहे. या चित्रपटांमध्ये पुरंदादा या शिष्याची भूमिका त्याने केली आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी श्री बाबा नीब करोरी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. शरद सिंग ठाकूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. गेली ५ ते ७ वर्षे ते या चित्रपटासाठी संशोधन करीत होते. या चित्रपटामध्ये मिलिंद गुणाजी, अविनाश वधावन, हितेन तेजवानी असे मातब्बर कलावंत आहेत. सध्या हा चित्रपट त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरलेला आहे.‘मुरांबा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलेली आहे. विश्वनाथ तांबटकर या उद्योजकाची भूमिका त्याने साकारली आहे. मिशी, चष्मा, सुटबूट असा त्याचा पेहराव आहे. त्याचा हा पेहराव प्रेक्षकांना देखील खूप आवडलेला आहे. सुरुवातीला प्रेक्षकांना तो व त्याची पत्नी नकारात्मक भूमिकेत आहे असे वाटते, परंतु हळूहळू त्यांना कळते की विश्वनाथ चांगला असतो व त्याची पत्नी वाईट असते. ती घरामध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करते. खूप दिवसांनी मराठी मालिकेमध्ये काम केल्याने त्याला देखील एक प्रकारचे समाधान मिळाले आहे आणि प्रेक्षक देखील त्याला मराठी मालिकेमध्ये पाहून सुखावले आहेत. त्याला कुठेही चाहत्यांनी पाहिले की तांबटकर नावाने हाक मारतात.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी त्याने बालाजी टेलिफिल्म्ससोबत काम केले होते. त्याच्याच प्रॉडक्शनच्या कलर्स वाहिनीवरील 'नागीण' या हिंदी मालिकेमध्ये देखील त्याने काम केले आहे. नागीणच्या वडिलांची भूमिका त्याने साकारली होती. पंजाबी कुटुंब दाखविले होते. अतिरेकी येऊन त्याचा खून करतात. मग त्याची मुलगी नगीनचे रूप घेऊन त्यांच्या खुनाचा बदला घेते. या मालिकेमध्ये लवकर त्याचा मृत्यू दाखविल्याने प्रेक्षकांमध्ये हळहळ निर्माण झालेली आहे. या मालिकेत वी. एफ. एक्स तंत्राचा चांगला वापर करण्यात आलेला आहे. अभिनयाची चौफेर मुशाफिरी करणाऱ्या पंकजला भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल

एका निरीक्षणाची प्रस्तावना

भालचंद्र कुबल-पाचवा वेद एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रंगभूमीवरील

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी