Sindhudurg Murder News : फोंडा घाटात मित्राच्या हत्येचा धक्कादायक कट उघड; मृतदेह आणि दुचाकी दरीत फेकून अपघाताचा बनाव, ४ जण अटकेत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पाच वर्षांपूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा मुंबई क्राइम ब्रांचने (Mumbai Crime Branch) उलगडा केला आहे. मित्राची हत्या (Murder) करून त्याला रस्ता अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे.


मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-7 (Mumbai Crime Branch Unit-7) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत धक्कादायक माहिती समोर आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. माळशिरस, सोलापूर) याची पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुरेश चंद्रहास सोनावडेकर, मनोज नारायण भंडगे, अतिश भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.



तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अशपाक मुलाणी याला सिंधुदुर्गातील कुडाळ (Kudal) येथील एका हॉटेलमध्ये (Hotel) बोलावले होते. उशिरा रात्री सर्वांनी मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह आणि त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली. हा मृत्यू रस्ता अपघातात झाल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.


सुरुवातीला हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले होते. मात्र, मुंबई क्राइम ब्रांचला (Mumbai Crime Branch) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास पुन्हा सुरू करण्यात आला. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आला. हे प्रकरण सिंधुदुर्गमधील कणकवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून अटक केलेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे प्रकटीकरण-1 चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी याबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Piyush Goyal : नऊ मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योग, व्यवसायांना मिळाली चालना

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपतींनी आणि नागरिकांनी भारतीय उत्पादने आणि सेवा जागतिक बाजारपेठेत नेताना उचित व्यापार

FCRA : एफसीआरए दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे

नवी दिल्ली : लोकसभेत तीव्र गदारोळ आणि आक्षेपांनंतर केंद्र सरकारने ‘परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, २०२६’

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Plastic Currency : चलनात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण