Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार



मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मरोळ मच्छी मार्केटच्या विकासाबाबत मच्छीमार बांधवांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून आधुनिक, प्रशस्त आणि सर्व आवश्यक सुविधांयुक्त वास्तू उभारण्यात यावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या वास्तूचे बांधकाम दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगाच्या दृष्टीने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.


मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



बैठकीत मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणे, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि आधुनिक पद्धतीने मार्केट विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मच्छीमार बांधवांसाठी उभारण्यात येणारी ही वास्तू अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी उपलब्ध जागा आणि तांत्रिक बाबींचा विचार करून चार मजल्यांपेक्षा उंच इमारत उभारण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. मार्केटमध्ये मच्छी विक्रेते, मच्छीमार तसेच ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्वच्छता, पाणी, साठवणूक, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांचा समावेश करण्याबाबतही त्यांनी भर दिला.


या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या