Friday, June 12, 2026

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच...; चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच...; चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

Prajakta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, निर्मिती आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

लवकरच तेलुगू चित्रपटसृष्टीत दिसणार

मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता माळी आता तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून, हा चित्रपट याच वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

या नव्या प्रोजेक्टबाबत बोलताना प्राजक्ताने सांगितले की, चित्रपटाची कथा, कलाकारांची नावे तसेच तिच्या भूमिकेबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. त्यामुळे या चित्रपटातील तिची भूमिका, कथानक आणि कलाकारांविषयीची माहिती अद्याप गुप्त आहे. त्यामुळे प्राजक्ताचा लूक कसा असेल? ती कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार? आणि तिच्यासोबत कोणते कलाकार दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता मराठी मनोरंजनविश्वात यशस्वी ठरलेली प्राजक्ता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिच्या या नव्या प्रवासामुळे चाहतेही प्रचंड आनंदित झाले असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >