Powai Lake : पवई तलाव परिसराच्या लखलखाटासह कॅमेरांचीही दृष्टी सुधारणार

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पवई तलावाच्या (Powai Lake) ठिकाणी आता प्रेमी युगूल आणि पर्यटकांवर विशेष लक्ष राहणार आहे. याठिकाणी तरुण तरुणींसह मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने याठिकाणचा परिसर अधिक प्रकाशमान करून तिथे लखलखाट केला जाणार आहे. तसेच यापूर्वी बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरांच्या (CCTV Cameras) देखभालीसाठी संस्था नियुक्त नसल्याने यातील कॅमेरांची नजर कमी झाली होती, त्यांचीही आता नजर तीव्र करण्यासाठी त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


पवई तलाव हा मुंबई पूर्व उपनगरातील एक मोठा तलाव (Powai Lake) असून या ठिकाणच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूचे अनेक लोक याठिकाणी येत असतात. पवई तलाव परिसरात शैक्षणिक सहली, मॅरेथॉन व धावण्याच्या स्पर्धा, दुर्गा व गणेश मूर्ती विसर्जन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे स्थानिक आमदार व खासदार यांच्याकडून या परिसराची योग्य देखभाल करण्याची मागणी होत आहे.



पवई तलाव परिसर आठवड्याचे सातही दिवस संपूर्ण दिवस खुला असल्याने तसेच अनेक लोकांची वर्दळ असल्याकारणाने या परिसरात सीसीटीव्ही व पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिस विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तसेच, महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागानेही सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


या ठिकाणी असलेली लोकांची वर्दळ तसेच खुल्या परिसरामुळे पवई तलाव उद्यान (निसर्ग उद्यान) व तलाव परिसरातील विद्युत आणि सीसीटीव्ही निरीक्षण (Surveillance) प्रणालीचे परिचलन आणि परिरक्षणाचे काम अखंडीतपणे चालू राहणे आवश्यक आहे. यासाठी सहाय्यक अभियंता नगरबाह्य विभाग (प्रमुख जलवाहिन्या) या विभागांतर्गत असलेल्या पवई तलाव उद्यान (निसर्ग उद्यान) येथील विद्युत आणि सीसीटीव्ही निरीक्षण (Surveillance) प्रणालीचे परिचलन आणि परिरक्षणाचे करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणू करण्यात येत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले जाणार असून या करता ए जी एम इंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक

Kurla landslide incident : कुर्ला आणि राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी व मृतांची माहिती समोर; ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी

मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी आणि मृतांची प्राथमिक

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन; वरळी डोममध्ये भव्य कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र