Nashik Crime : रिक्षातच सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, दोघे ताब्यात, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : रिक्षामध्ये प्रवाशांची फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना अंबड पोलिसांच्या (Ambad Police) गुन्हे शोध पथकाने आणि गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कारवाईत अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे १५ तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडी (Untwadi) येथील रहिवासी नलिनी धनाजी गोसावी (वय ५८) यांनी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार दाखल केली होती. ६ जून रोजी रात्री त्या कुरूकवाडे येथून निमाणी बसस्थानकावर (Nimani Bus Stand) उतरून रिक्षाने घरी जात होत्या. यावेळी रिक्षाचालकाने गॅस संपल्याचा बहाणा करून त्यांना मध्येच उतरविले. त्यानंतर दुसऱ्या रिक्षाने त्या घरी पोहोचल्या. घरी गेल्यानंतर बॅगेतील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Nashik Crime News)



आरोपींच्या हालचालींचे १५० सीसीटीव्ही फुटेज


गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी फिर्यादींच्या घरापासून निमाणी बसस्थानकापर्यंत तसेच आरोपींच्या हालचालींचे सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयितांची ओळख पटली. पोलिसांनी रविंद्र मल्लू घुमडकर (वय ३७, रा. म्हसरूळ) याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली. तसेच दुसरा आरोपी रमेश बाबुराव जाधव (वय ५३, रा. अमृतधाम, नाशिक) याला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कारवाईत दोन्ही आरोपींकडून रिक्षा आणि सोन्याचे दागिने असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त किशोर काळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत तसेच पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी (गुन्हे) व पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, गुंडा विरोधी पथकाचे पोलिस उपनिरिक्षक संदिप पवार, पोलिस हवालदार सुनिल आडके, अवी देवरे , विजय सुर्यवंशी, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे,, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, तुषार मते, अनिल गाढवे, फरीद ईनामदार, वैभव एखंडे, मयुर पवार आदींनी कामगिरी केली असुन पुढील तपास पोहवा योगेश देसले हे करित आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण