Crime News : मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल आता आहे कुठे ?

सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांचं प्रेमप्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रेमाचं लग्नात रूपांतर होण्याआधीच सक्षम ताटे याचा मृत्यू झाला. पण दोघांमध्ये प्रेम एवढं घट्ट होतं की चक्क प्रियसी आंचल मामीडवार हिने सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न केलं आणि आयुष्यभर त्याच्याच घरी राहण्याचं वचन दिलं पण आता हे वचन देणारी आंचल मामीडवार अचानक त्याचे घर सोडून गेल्याची घटना समोर आली आहे.



नांदेडची आंचल मामीडवार ही प्रियकर सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर ८ महिने त्याच्या घरी राहत होती. हे दोघे गेले ३ तीन वर्ष प्रेमसंबंधात होते. दोघांची जात वेगळी. आंचलच्या घरच्यांना ह्या दोघांचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं. त्यामुळे तिचे वडील गजानन मामीडवार आणि तिचे दोन भाऊ हिमेश मामीडवार, साहिल मामीडवार यांनी सक्षमला गोड बोलून चहा प्यायला चल म्हणून नेले आणि तिथेच त्याची हत्या केली. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तिला दुसऱ्या दिवशी सक्षमच्या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर थेट आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जात आंचल मामीडवार सक्षमच्या घरी पोहोचली.



सक्षमच्या घरी त्याचा मृतदेह पाहून आंचल भावूक झाली तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथे थेट तिने त्याच्या नावाचे कुंकू भरले. त्याच्या आईला म्हणाली की मी आयुष्यभर तुमचा सांभाळ करेल आणि तुमची काळजी घेऊन याच घरात राहील. मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही, असे आंचल मामीडवार म्हणताना दिसली. आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही म्हणणारी आंचल ही गेल्या साडेतीन महिन्यांपासून एकट्या सासूला सोडून तिच्या घरी गेली.


मिळालेल्या माहितीनुसार सक्षमची आई म्हणाली तिने एकेदिवशी अचानक म्हटले की, माझ्या आजीची तब्येत खराब झाली आहे, मी घरी जाते. त्यानंतर मी स्वत: तिला तिच्या घराजवळ सोडून आले. पण त्यानंतर तिचा काहीच संपर्क झाला नाही. गेल्या साडेतीन महिन्यापासून ती कुठे आहे काहीच माहिती नाही. सक्षमचे घर सोडून ती पुन्हा आपल्या घरच्यांकडे राहिला गेली की अजून कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी