Simhastha Kumbh Mela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना ‘नो एंट्री’; ३ लाख वाहनांच्या पार्किंगची तयारी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना ‘नो एंट्री’ लागू करण्यात येणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांची वाहने शहराबाहेरील नियोजित वाहनतळांवर थांबवून, तेथून विशेष बससेवेद्वारे घाट परिसरात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी कुंभमेळा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


२०१५ च्या कुंभमेळ्यात शहराच्या (Nashik) सीमेवर वाहनतळ उभारण्यात आले होते. मात्र, त्यावेळी लाखो भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील कुंभमेळ्यातील अनुभव, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी आदींचा अभ्यास करून २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी प्रमुख मार्गांलगत नवीन वाहनतळांची निवड करण्यात आल्याचा दावा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) केला आहे.



३ लाख वाहनांच्या पार्किंगची तयारी


भाविकांच्या सोयीसाठी त्रिस्तरीय वाहनतळ व्यवस्थेची (Three-level parking facility) आखणी करण्यात आली असून, नाशिकमध्ये सुमारे ८८८ हेक्टर क्षेत्रावर ४६, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ६७१ हेक्टरवर २६ वाहनतळ प्रस्तावित आहेत. या वाहनतळांमध्ये एकत्रितपणे सुमारे तीन लाख वाहनांची क्षमता असेल. दुचाकी, चारचाकी आणि बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


अमृत स्नानाच्या गर्दीच्या दिवशी शहर परिसर वाहनमुक्त ठेवण्याचे नियोजन आहे. बाह्य वाहनतळांपासून घाट परिसरापर्यंत सुमारे तीन हजार एसटी बसच्या माध्यमातून शटल सेवा चालविण्यात येणार असून, भाविकांना संबंधित घाटांपर्यंत पोहोचवले जाईल.



त्रिस्तरीय वाहनतळ व्यवस्था कशी असेल ?


प्रमुख मार्गांवर पहिल्या टप्प्यात बाह्य वाहनतळ (आऊटर पार्किंग) उभारले जातील. दुसऱ्या स्तरावरील वाहनतळ ‘बफर’ म्हणून वाहतुकीचा ताण कमी करतील. तर अंतर्गत वाहनतळांपर्यंत केवळ विशेष बससेवेद्वारे भाविकांना नेले जाईल. पुढील घाट परिसर पायी प्रवासासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.अमृत स्नानाच्या दिवशी मुख्य शहर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनतळांपासून भाविकांचा पुढील प्रवास सुरळीत आणि शिस्तबद्ध व्हावा, यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे,” असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.



​शहर वाहनमुक्त राहणार


​कुंभमेळ्यातील (Simhastha Kumbh Mela 2027) अमृत पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची खासगी वाहने नाशिक व त्र्यंबकेश्वरबाहेर थांबवली जातील. या वाहनांसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर वाहनतळांचे नियोजन करण्यात आले आहे. अमृत स्नानाच्या दिवशी मुख्य शहर परिसर वाहनमुक्त ठेवण्याचे नियोजन आहे. वाहनतळावर उतरणाऱ्या भाविकांना तीन हजार बसमधून अमृत स्नानासाठी त्या, त्या भागातील निकटच्या घाटाकडे नेले जाईल.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष