Nashik : बागलाणमध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा ! मका, कांदा अन् द्राक्ष उत्पादकांची मोठी फसवणूक

Nashik News : शेतकऱ्यांवर येणारं संकट , त्याची होणारी पिळवणूक नेमकी थांबणार कधी हा मोठा प्रश्न पुन्हा एका घटनेनं उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी फसवणूक झाली आहे. व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बागलाण (Baglan) तालुक्यात उघडकीस आला आहे.


विशेष म्हणजे, मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police Station) एकाच दिवशी तब्बल तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



मका उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाखांचा गंडा ?


पहिली धक्कादायक घटना ताहाराबाद (Taharabad) येथील ‘मुक्ताई ट्रेडिंग कंपनी’शी (Muktai Trading Company ) संबंधित आहे. या कंपनीच्या संचालकांनी परिसरातील १७० ते १८० मका उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केला, मात्र त्याचे पैसेच अदा केले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मोहन शंकर भामरे (रा. पिंपळकोठे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्यापारी नारायण सुपडू बागूल, जयेश नारायण बागूल, दत्तात्रय सुपडू बागूल, संदेश दत्तात्रय बागूल आणि उमेश पाटील यांनी फेब्रुवारी २०२६ पासून शेतकऱ्यांकडून मका खरेदी सुरू केली होती.


महिन्याभरात पैसे देतो” असे गोड बोलून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात आला. मात्र, महिना उलटल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करत तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकरी आज पैसे मिळतील, उद्या मिळतील या आशेवर दिवस काढत होते. मात्र अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ( Baglan Crime News )



कांदा उत्पादकांनाही सोडले नाही


धक्कादायक बाब म्हणजे, मका खरेदीतील फसवणुकीचे आरोप असलेल्या याच व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. कैलास गोपीचंद ठाकरे (रा. लाडुद, ता. बागलाण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परिसरातील तब्बल १०२ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात आला. पैसे महिन्याभरात देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र नंतर शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावण्यात आले. अखेरीस, विक्री केलेल्या कांद्याचे पैसे न मिळाल्याने ७० लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Baglan Crime News )



द्राक्ष उत्पादकांनाही लाखोंचा फटका


त्यासोबतच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांनी मोठा आर्थिक झटका दिल्याचे उघड झाले आहे. देवेंद्र दिलीप धोंडगे (रा. खामलोण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक मगन बोढारे (रा. सिडको, नाशिक) आणि शशिकांत दौलत गवळी (रा. नारायणटेंभी, ता. निफाड) या व्यापाऱ्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी केली होती. '२१ दिवसांत पैसे देतो' असे आश्वासन देत ६९ लाख ३५ हजार २८३ रुपयांची द्राक्षे खरेदी करण्यात आली. मात्र, मुदत संपल्यानंतरही व्यापाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.( Baglan Crime News )



घामाचा पैसा अडकला; शेतकरी हवालदिल


रात्रंदिवस मेहनत करून, नैसर्गिक संकटांचा सामना करत उभा केलेला शेतमाल विकल्यानंतरही घामाचा पैसा व्यापाऱ्यांकडे अडकून पडल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता या संशयित व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळून अडकलेले कोट्यवधी रुपये तातडीने वसूल करून द्यावेत, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी