Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत क्रेनला आग लागली असून दोन क्रेन ऑपरेटर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Port Crane Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता मुंबई पोर्ट येथील बीपीएस पोर्टवर बार्बाडोस देशाचा ध्वज असलेले ‘व्हिएंना’ (Vienna) हे वेसल उभे होते. या वेसलमधील सुमारे १४० मेट्रिक टन वजनाचा कार्गो ‘बरकत’ कंपनीच्या दोन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू होते. (Mumbai Port Crane Accident)


https://www.prahaar.in/2026/08/30/chief-minister-assures-a-way-forward-on-the-maratha-agitation-issue/

कार्गो उचलत असताना एका क्रेनला कार्गोशी जोडलेला पट्टा (स्ट्रॅप) इम्बॅलन्स झाल्याने निघून गेला. त्यामुळे कार्गोचा संपूर्ण भार दुसऱ्या क्रेनवर आला. अचानक वाढलेल्या वजनामुळे संबंधित क्रेन जमिनीपासून वर उचलली गेली आणि तिचा पुढील टेलिस्कोपिक बूम वेसलवर आदळला. या धडकेत झालेल्या घर्षणामुळे क्रेनला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोर्ट अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Mumbai Port Crane Accident)


https://www.prahaar.in/2026/08/30/the-neet-pg-exam-was-conducted-under-tight-security-and-direct-hands-on-supervision/

या दुर्घटनेत ‘बरकत’ कंपनीच्या क्रेनमधील क्रेन ऑपरेटर रणजीतसिंग आणि निशांत सिंह हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून दुर्घटनेमागील नेमके कारण आणि सुरक्षेतील त्रुटींचा तपास केला जात आहे. (Mumbai Port Crane Accident)




Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या