Thane : ठाण्यात कोरम मॉलसमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

ठाणे : जून महिन्यातील नऊ दिवस झाले तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. अशातच ठाण्यात कोरम मॉलसमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.


जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठा फवारा उडाला. पाणी जवळच तयार होत असलेल्या मेट्रो लाईनपर्यंत पोहोचले. कोरम मॉलसमोर मोठे कारंजे सुरू झाले. पाण्याचा फवारा थेट मेट्रो लाईनच्या खांबांना आणि ट्रॅकला घासून वर उडत होता. यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली.



आधीच ठाणेकर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त आहेत. अशातच जलवहिनी फुटल्यामुळे आता ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच ठाणे मनपाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले. पण मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्यामुळे पाणीकपात अपरिहार्य आहे.


ठाण्याची दैनंदिन पाणी मागणी ५९० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) आहे. सध्या ५३ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) तूट आहे. आता जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी तूट वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे मनपाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

Sunetra Pawar : चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि

Rahul Narvekar : शिवसेना आमदारांच्या पात्रता - अपात्रता प्रकरणी शाश्वत निर्णय दिल्याचा नार्वेकरांचा दावा

मुंबई : "विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे ही माझी घटनात्मक जबाबदारी होती. या

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा दावा धादांत खोटा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग आणि नवीन नोंदणीत महाराष्ट्रच देशात प्रथम

Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.