Sunetra Pawar : चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक



उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना


पुणे : चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधा संबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली व उद्योजकांना आश्वस्त केले आहे. यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.



वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश


या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल,असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी