Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष असून दोन्ही प्रमुख पालख्यांच्या प्रस्थानाच्या तारखा आणि मुक्कामांची माहिती निश्चित करण्यात आली आहे.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता देहू नगरीतून पंढरपूरच्या दिशेने ऐतिहासिक प्रस्थान करणार आहे.



संत तुकाराम महाराज पालखीचे मुक्काम


- ७ जुलै २०२६ (पहिला मुक्काम): इनामदार वाडा, देहू (पिंपरी-चिंचवड)


- ८ जुलै २०२६ (दुसरा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर, आकुर्डी (पिंपरी-चिंचवड)


- ९ आणि १० जुलै २०२६ (तिसरा व चौथा मुक्काम): श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे शहर)


- ११ जुलै २०२६ (पाचवा मुक्काम): कदमवाक वस्ती, लोणी काळभोर – नवीन पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १२ जुलै २०२६ (सहावा मुक्काम): श्री भैरवनाथ मंदिर, यवत (पुणे ग्रामीण)


- १३ जुलै २०२६ (सातवा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर, वरवंड (पुणे ग्रामीण)


- १४ जुलै २०२६ (आठवा मुक्काम): उंडवाडी गवळ्याची, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १५ जुलै २०२६ (नववा मुक्काम): शारदा विद्यालय प्रांगण, बारामती (पुणे ग्रामीण)


- १६ जुलै २०२६ (दहावा मुक्काम): सणसर, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १७ जुलै २०२६ (अकरावा मुक्काम): निमगाव केतकी, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १८ जुलै २०२६ (बारावा मुक्काम): इंदापूर, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १९ जुलै २०२६ (तेरावा मुक्काम): सराटी, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६


दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. एकूण ३३ दिवसांच्या या भक्तिमय प्रवासानंतर पालखी ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे.



पुण्यातील मुक्कामाचा पेच अखेर सुटला


माऊलींच्या पुण्यातील मुक्कामावरून गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विठोबा मंदिरातील आवश्यक सुविधांबाबत लेखी हमी दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सुरुवातीचे प्रमुख मुक्काम


- ८ जुलै २०२६ (पहिला मुक्काम): गांधी वाडा, आळंदी


- ९ आणि १० जुलै २०२६ (दुसरा व तिसरा मुक्काम): श्री विठोबा मंदिर, भवानी पेठ (पुणे शहर)


- ११ आणि १२ जुलै २०२६ (चौथा व पाचवा मुक्काम): सासवड (पुणे ग्रामीण)


- १३ जुलै २०२६ (सहावा मुक्काम): जेजुरी (पुणे ग्रामीण)


- १४ जुलै २०२६ (सातवा मुक्काम): वाल्हे (पुणे ग्रामीण)


- १५ जुलै २०२६ (आठवा मुक्काम): लोणंद (पुणे ग्रामीण)


- १६ जुलै २०२६ (नववा मुक्काम): तरडगाव (पुणे ग्रामीण)


विशेष म्हणजे, संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) या दोन्ही पालख्यांचे ९ आणि १० जुलै रोजी पुणे शहरात मुक्काम असणार आहेत. नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात दोन दिवस भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळणार असून लाखो वारकरी आणि भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वागत, वाहतूक नियोजन आणि सुरक्षेसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा