Devendra Fadnavis : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे प्रकटीकरण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; 'संविधानविरोधी कृत्यांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला'


मुंबई : "राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केलेले आंदोलन म्हणजे देशातील तरुणांची अभिव्यक्ती नसून, समाजात अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेचे प्रकटीकरण आहे. हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घ्यायचे आणि त्याच संविधानाने तयार केलेली लोकशाही व्यवस्था व संस्था उखडून टाकण्याची भाषा करायची, या दुटप्पी आणि संविधानविरोधी कृत्यांनी या आंदोलकांचा खरा चेहरा आज देशासमोर उघडा पाडला आहे," अशा अत्यंत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सीजेपी'च्या आंदोलनाचा समाचार घेतला.



कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे शनिवारी अमेरिकेतून भारतात परतताच थेट आंदोलनात सहभागी झाले. विमानतळावरून बाहेर पडताना हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र घेऊन त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जंतरमंतरवर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या तरुणांसमोर आंदोलनादरम्यान झालेली भाषणे आणि दिल्या गेलेल्या घोषणांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून तीव्र आक्षेप नोंदवला.


या आंदोलनावर देशपातळीवरून उमटत असलेल्या तीव्र प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये (आर्टिकल) या देशाच्या लोकशाहीची मूलतत्त्वे सामावलेली आहेत. जी व्यवस्था आणि ज्या संस्था संविधानाने निर्माण केल्या, त्यांनाच नाकारण्याचे मनसुबे जंतरमंतरवरील भाषणांमधून व्यक्त झाले आ

">हेत. लोकशाहीची ही मूलतत्त्वे नाकारणारे लोक हातात अशी पुस्तके घेऊन फिरले, तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधी आहेत."



छुपे मनसुबे जनतेसमोर उघड


आजच्या या तथाकथित अभिव्यक्तीने आंदोलकांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि छुपे मनसुबे जनतेसमोर उघडे झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाला देशातून कोणतेही जनसमर्थन मिळालेले नाही, असे सांगितले. देशात अशा प्रकारे कायदा आणि व्यवस्थेला आव्हान देणारी कोणतीही मानसिकता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags
Jantar MantardemocracyMaharashtra politicsDevendra Fadnavisindian constitutionMumbai NewsPolitical ControversyCockroach Janata PartyCJPPolitical Protest
Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग