BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज



मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमहानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते हे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये महानगरपालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या (सीएफसी) ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म व मृत्यू नोंदणीतील अर्जाकारिता बालकाचे नाव समाविष्ट करणे , जन्म / मृत्यू प्रमाणपत्र दुरुस्ती, जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर विवाह प्रमाणपत्र दुरुस्ती या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


नव्या संगणकीय प्रणालीच्या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेतानाच एका कालबद्ध पद्धतीने जन्म दाखल्यातील दुरूस्त्या करून मिळणार आहे. या सुविधेमुळे नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी वेळोवेळी अर्जस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीच्या पुढील टप्प्यात नागरिकांना अर्जस्थितीची माहिती देण्यासाठी एसएमएसचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.



नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम सेवा ऑनलाईन स्वरूपात सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने सर्व विभागीय कार्यालयांच्या (वॉर्ड) कार्यक्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रांमार्फत (सीएफसी) जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्ज स्वीकारण्याची नवीन संगणकीय प्रणाली व्यवस्था सुरू केली आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन आपल्या अर्जाचा पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही.


यापूर्वी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे, नोंदीतील दुरुस्ती तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील अर्ज नागरिकांना संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करावे लागत होते. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात भेट द्यावी लागत असे. तसेच अर्जांची प्रलंबित स्थिती व कामाचा भार यांचे प्रभावीपणे निरीक्षण करणे विभागासही आव्हानात्मक ठरत होते. त्यार पार्श्वमभूमीवर हा महत्व पूर्ण निर्णय घेण्याभत आला आहे. विहित कालावधीत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या प्रणालीचा फायदा होईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला आहे.



नागरी सुविधा केंद्र (सीफएसी) मार्फत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया


जन्म व मृत्यू नोंदीतील दुरुस्ती, जन्म / मृत्यू प्रमाणपत्र मिळविणे तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करणे (जन्मापासून १५ वर्षांच्या आतील) इत्यादी बाबींकरिता आवश्यक अर्ज व विहित कागदपत्रे नागरिक सुविधा केंद्राच्या कक्षाच्या ठिकाणी स्वीकारण्यात येतील.



अर्जाचा पोचपावती क्रमांक उपलब्ध होणार


अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जदारास पोचपावती क्रमांक देण्यात येईल. सदर क्रमांकाचा वापर भविष्यातील संदर्भासाठी तसेच अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक पाठपुराव्यासाठी करता येईल. कार्यालयीन स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी व पुढील कार्यवाही संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यासाठी स्वतंत्र व सुसूत्र प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. यामुळे अर्जांची कार्यवाही, प्रलंबित अर्ज व त्यावरील निर्णय यांचे अधिक प्रभावीपणे परीक्षण करणे शक्य होणार आहे. ‘एसएमएस’ द्वारे अर्जाची स्थिती जाणून घेण्याची सुविधा आगामी टप्यात उपलब्ध होणार आहे.



क्यू आर कोड प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र खिडकी


शैक्षणिक बाबी, परदेश दोऱ्यासाठी तसेच विविध कारणात्सव जन्म दाखल्यांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांमार्फत मोठ्या प्रमाणात अर्ज संबंधित विभाग कार्यालयात येत असतात. अशा अर्जदारांसाठी नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करणे याठिकाणी शक्य होणार आहे.



सन २०१६ पूर्वीच्या जन्म व मृत्यू नोंदी


सन २०१६ पूर्वी नोंदविण्यात आलेल्या जन्म व मृत्यूच्या नोंदींसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या Civil Registration System (CRS) पोर्टलद्वारे नवीन स्वरूपातील जन्म/मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)