Devendra Fadnavis : इस्रायलमध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

शिवराज्याभिषेक दिनी महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले पत्र


मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इस्रायल देशामध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) यानीव रेवाच यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याबाबतचे पत्र सुपूर्द केले आहे. त्याचप्रमाणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक सल्ला आणि आवश्यक सहकार्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत रुजू झाल्यानंतर यानीव रेवाच यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास अभ्यासला. शिवरायांचे शौर्य, सुशासन, धार्मिक सहिष्णुता, आरमारी ताकद आणि प्रजाहिताची दूरदृष्टी यांमुळे प्रभावित होऊन त्यांनी इस्रायलमध्ये शिवरायांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.(Ramdas Atawale)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात यानीव रेवाच यांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज हे पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारे एक अद्वितीय नेतृत्व आहेत. मी भारतात जिथे कुठे प्रवास करतो, तिथे मला लोकांच्या मनात इस्रायलच्या राष्ट्रनायकांबद्दल आदर दिसतो. त्यामुळेच आता इस्रायलमधील नागरिकांनाही छत्रपती शिवरायांच्या महान इतिहासाची ओळख व्हावी, यासाठी आम्ही हा पुतळा उभारण्याचे निश्चित केले आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय ज्यू (बेने इस्रायली) समुदायामधील ऐतिहासिक संबंधांना उजाळा देणारे ठरेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


अभिमानास्पद आणि ऐतिहासिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


इस्रायल सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "हा निर्णय महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे. शिवराज्याभिषेक दिनासारख्या पवित्र दिवशी इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केल्याबद्दल मी इस्रायलचे महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांचे मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आणि ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे संपूर्ण तांत्रिक, कलात्मक आणि प्रशासकीय सहकार्य करेल," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

Comments
Add Comment

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम, मॅनेजरसह तरुणाला अटक

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद किंवा आवश्यक पडताळणी न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट