संत आऊबाई

शून्य साकारलें साध्यांत दिसे।
आकार नासे तेथें शून्याकार दिसे॥
शून्य तें सार शून्य तें सार।
शून्य चराचर सामावलें॥
नामयाची बहीण आऊबाई शून्य सामावली।
विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती॥



संत आऊबाई ही संत नामदेवांची बहीण. आऊबाईचा एकच अभंग उपलब्ध आहे. संत सहवासाचा काय परिणाम होतो याचे आऊबाई हे उत्तम उदाहरण आहे. नामदेवांच्या सहवासात तिच्या अध्यात्मविषयक जाणिवा किती प्रगल्भ झाल्या होत्या याची प्रचिती या एकाच अभंगातून येते. संतांबाबतचे 'आपुल्यासारखे करिती तात्काळ' हे संतांबाबतचे वचन किती सार्थ आहे याचे प्रत्यंतर संत नामदेवांच्या बाबतीत पुन्हा पुन्हा येते. या अभंगात संत आऊबाई म्हणते, शून्न साकारले आहे आणि आपल्या साध्यात ते प्रतिबिंबीत होत आहे. साधनेच्या आरंभीच्या अवस्थेत मनात जो शब्द निर्माण होतो त्याला म्हणतात शून्य. शून्य म्हपाजे अभाव किंवा काहीच नसणे. अध्यात्मात शून्य, अतिशून्य, महाशून्य आणि सर्वशून्य अशी चार प्रकारची शून्ये आहेत. जिथं आकार नाही तिथं शून्याकार दिसतो. शून्य है विश्वाचे सार आहे." नामदेवांची बहीण आऊबाई म्हणते, मीही शून्यात सामावून गेले आहे. साऱ्या चित्रवृत्ती विठ्ठलाच्या भक्तीरंगात एकरूप झाल्या आहेत.




" सामान्यतः जनलोकांना चमत्कारांचे आकर्षण असते. मात्र या चमत्कारांचे स्वरूप होतातून उदी वा अंगठी काढणे, वस्तू नाहीशी होऊन पुन्हा प्रकट होणे अशा प्रकारचे असते. वस्तुतः नामदेवांच्या कुटुंबातील चौदा कुटुंबीय आणि मोलकरीण जनाबाई असे सर्वजण अभंगरचना करतात हा जगातला मोठा चमत्कार आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये… नोंदविला जाण्यायोग्य आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात सर्व देवता हे शून्याचं व्यक्तरुप आहे, असं प्रतिपादन केलं आहे. शून्य अनेक अंगांनी लोककल्याणाचं कार्य करत असतं. व्यवहारातही शून्याचं खूप महत्त्व आहे. एखाद्या संख्येच्या उजवीकडची शून्ये वाढत गेली की त्या वस्तूचे मूल्य त्या प्रमाणात वाढत जाते. उजवीकडील शून्यांची वाढणारी संख्या हे उन्नतीचे वा प्रगतीचे लक्षण आहे. शून्याचा शोध भारतीयांनीच लावला आहे.


शून्याचे गणित अजब आहे. शून्यातून शून्य वजा केले तरी शून्यच उरते. शून्याचा आकार पृथ्वीसारखा गोल आहे. म्हणजे शून्य हे सर्वव्यापी आहे. अध्यात्मात शून्य ही योगसाधनेच्या मार्गात येणारी अनुभूती आहे. आयुष्य संपलं की माणूसही शून्याकार होतो. शून्याचे संदर्भ आपल्या आयुष्याला अनेक अंगांनी व्यापलेले आहेत. व्यवहारात हाती सून्य असताना आपल्या कर्तृत्वाच्या बळावर विश्व उभे करणाऱ्या व्यक्ती या समाजाला प्रेरणा देतात.संत आउबाईचा एकच अभंग तिचा आध्यात्मिक अधिकार सिद्ध करतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो.


___- डॉ. देवीदास पोटे

Comments
Add Comment

संत निवृत्तीनाथ

अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ। विज्ञान केवळ वृक्ष तया।। साधनी स्वानुभव अनुभवी

संत निळोबाराय

एवढासा माझा भाव तो कायी। तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं॥ परी तुमचें अगाध देणें। जाणवलें

संत नामदेव

वारंवार काय विनवावे आता। समजावें चित्ता आपुलिया ॥ तू काय म्हणशी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उडोनियां ॥ मजलागी

संत ज्ञानेश्वर

समाधि साधन संजीवन नाम। शांति दया सम सर्वांभूतीं॥१॥ शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू। हरिनाम उच्चारू दिधला

संत कबीर

अपनी कहै मेरी सुनै, सुनि मिलि एकै होय । हमरे देखत जग जात है, ऐसा मिला न कोय।। आयुष्यात समन्वयाचे महत्व खूप आहे.

संत नामदेव

भक्त विठोबाचे भोले। त्यांचे पायी ज्ञान लोले।। भक्तिविण शब्दज्ञान। व्यर्थ अवघे ते जाण।। नाही ज्याचे चित्ती