संत मुक्ताबाई

प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण।
दीपें दीप पूर्ण एका तत्त्वे।।
देखिले गे माये पंढरी पाटणी।
पुंडलिका अंगणी विठ्ठलराज॥
विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज।
निगुणेशी चोज केले सये।।
मुक्ताबाई तारक सम्यक विठ्ठल।
निवृत्तीने चोखाळ दाखविले॥


संत मुक्ताबाई ज्ञानदेवांचा वारसा पुढे चालवित होती. मुक्ताबाईचे आयुष्य अल्प आणि अभंगही थोडेच आहेत. मात्र अनुभूतीचे सखोल तरंग तिच्या अभंगात उमटले आहेत. मुझावाई भावडांबरोबर पंढरपूरला आली होती. इतर संतांप्रमाणे तिलाही पंढरपूरचा विठ्ठलाचे वेड लागले होते. योगाबरोबरच भक्तीरंगाच्या प्रांतातही मुक्ताबाईच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटलेला दिसून येतो.



या अभंगात मुक्ताबाई म्हणते, ‘या’ विठ्ठलाचे रूप निर्गुण आहे' आणि सगुणही आहे. दोन ज्योती वेगळ्या दिसला तरी त्यामधील प्रकाशाचे तत्त्व एकच आहे. मी पंढरपूरला पुंडलिकाच्या अभंगात विठ्ठलराजाला पाहिले.



विज्ञानाच्या प्रत्यक्ष वा सगुण रूपाने विठ्ठलाचे अस्तित्व आहेच, पण निर्गुण रूपातूनही विठ्ठलाने चराचरातले आपले अस्तित्व दाखविले आहे. •संत मुक्ताबाई म्हणते, हा विठ्ठल दोन्ही अंगांनी जाणवतो. तो सम्यक म्हणजे दोन्ही अर्थानी अस्तित्वात आहे. तो भक्तजनांचा तारणहार आहे. सर्वांना संकटावून वाचवून सर्वांवर कृपेची बरसात करणारा आहे.
पंढरपूर हे भक्तीचे आद्यपीठ आणि विठ्ठल हा त्या विद्यापीठाचा कुलगुरू. भक्तीची सीईटी परीक्षा दिल्याशिवाय या विद्यापीठात प्रवेश मिळत नाही. ‘या’ विद्यापीठातले शिक्षण मनाला चैतन्यमय अनुभूती देणारे असते. इथल्या अभ्यासक्रमाचे सूत्र परीक्षेपुरते नसून आयुष्याला वळण देणारे असते. या विद्यापीठात जो अंतिम पदवी मिळवतो, त्याला आयुष्याचे सार समजते. आयुष्यच देवत्वाच्या जवळ जाते. जगण्याचा क्षणन् क्षण धन्य होतो.



मुक्ताबाईंवर मूळ संस्कार नाथपंथाचे. त्यामुळेच नाथपंथ आणि वारकरी पंथ यांचा सुंदर समन्वय मुक्ताबाईच्या अभंगवाणीत झाला आहे. ताटीच्या अभंगात ज्ञानरायाची समजूत घालताना जग जरी झाले वन्हीं । संती सुखे व्हावे वाणी ॥ हे तिचे उद्गार तिच्या प्रगल्भ, समंजस विचारसरणीचा आविष्कार आहेत.


__- डॉ. देवीदास पोटे


Comments
Add Comment

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

संत ज्ञानेश्वर

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फिटला

संत नामदेव

बाळ सगुण गुणाचं तान्हं गे बाळ सगुण गुणाचं तान्हं गे। बाळ दिसतं गोजिरवाणं गे। काय सांगता

संत निवृत्तीनाथ

अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ। विज्ञान केवळ वृक्ष तया।। साधनी स्वानुभव अनुभवी

संत निळोबाराय

एवढासा माझा भाव तो कायी। तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं॥ परी तुमचें अगाध देणें। जाणवलें