Ritu Tawade : मुंबई हिरवीगार करण्यासाठी महापालिकेची मोठी मोहीम; महापौर रितू तावडेंचे 'एक झाड लावा' आवाहन

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन


मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून महापौर रितू तावडे यांनी आज एकाच दिवशी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून या मोहिमेला सुरुवात केली. कांजूरमार्ग क्षेपणभूमीप्रमाणेच शहरातील सर्व क्षेपणभूमी परिसरांमध्ये तसेच गृहसंस्थांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून नागरी वने विकसित केली जाणार आहेत. या अभियानात प्रत्येक मुंबईकराने किमान एक झाड लावून सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.



जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी कांजूरमार्ग येथील कचरा प्रक्रिया केंद्र परिसरात महापालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिरुट ’ या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचा तावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, एस अँड टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी दळवी, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते बहावा आणि इतर स्थानिक वृक्षप्रजातींची लागवड केली. आज सुमारे ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘रिरुट’ उपक्रमांतर्गत कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात तब्बल १६ हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.



सातपेक्षा अधिक स्थानिक आणि पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींचा यात समावेश असणार आहे. सध्या या परिसरात सुमारे १२ हजार ८०० वनस्पती अस्तित्वात असून नव्या वृक्षलागवडीमुळे या भागाचे रूपांतर मोठ्या नागरी वनात होणार आहे. परिणामी मुंबईच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अपरिहार्य ठरत असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी व्यापक वृक्षलागवड केली जात असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे धोरण महापालिका राबवत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध ठिकाणी वनक्षेत्र विकसित केले जात आहे. कांजूरमार्गप्रमाणेच मुंबईतील इतर क्षेपणभूमी परिसरांमध्येही अशाच प्रकारचे हरित प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी कांजूर,मुलुंड,नाहूर,भांडुप आणि घाटकोपर येथे वृक्षारोपण केले. उपमहापौर संजय घाडी यांनीही कांजुरमार्ग क्षेपणभूमी येथे वृक्ष लागवड केली.

Comments
Add Comment

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या