Crime News : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी ८९ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सह-आयुक्त (अं. व द.) प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रदीप पवार यांनी संपूर्ण परिसरात परराज्यातील व बेकायदेशीर मद्य वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. पनवेल-मुंब्रा हायवेवरील दहिसर मोरी परिसरातून परराज्यातील अवैध मद्याची मोठी खेप नेली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने हालचाली करत दहीसर मोरी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर सापळा रचला. आणि काही वेळातच संशयित चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा सहाचाकी आयशर ट्रक (क्र. जीजे-२३-एवाय-१७१८) अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने ट्रकमध्ये वाहनांचे सुटे भाग भरलेले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.


मात्र, पक्की माहिती असल्याने पथकाने ट्रकची ताडपत्री काढून कसून तपासणी केली.तेव्हा अधिकाऱ्यांना खाकी रंगाचे शेकडो बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यात गोवा राज्यात निर्मिती झालेल्या 'रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की' या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचा साठा सापडला. विशेष म्हणजे या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर अथवा कमाल विक्री किंमत छापलेली नव्हती. महाराष्ट्र राज्यात या मद्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. पोलिसांनी ट्रकमधून एकूण १५३० बॉक्स जप्त केले, ज्यामध्ये ७३,४४० दारूच्या बाटल्या होत्या.





मोबाईल फोन असा एकूण १,८९,६६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रवीण कुमार विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या यशस्वी कामगिरीत निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आणि जवान कुणाल तडवी, अमित सानप, हनुमंत गाढवे व सागर चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार


आपल्या परिसरात कुठेही बनावट दारू, परराज्यातील बेकायदेशीर मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास, अथवा मिथेनॉल आणि क्लोरेल हायड्रेट सारख्या मानवी जीवाला घातक असणाऱ्या रसायनांची निर्मिती, भेसळ किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे; तसेच माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख संपूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा; फेक चॅट्स, बनावट ओळख अन् १.३० लाखांचा व्यवहार

मुंबई : मुंबई पोलिसांनी सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या एका कथित खंडणीच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे . या

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या