Saturday, June 6, 2026

Vaibhav Sooryvanshi : ब्रेकिंग न्यूज ! बेबी बॉसने टीम इंडियात येताच सचिनला टाकलं मागे !

Vaibhav Sooryvanshi : ब्रेकिंग न्यूज ! बेबी बॉसने टीम इंडियात येताच सचिनला टाकलं मागे !

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आता नवा इतिहास रचला आहे.भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजेच बीसाीसीआयने वैभवची भारतीय टी-20 संघात निवड केली आहे.इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला संधी देण्यात आली आहे. या सह वैभवने मास्टर बलास्टार सचिन तेंडूलकरांचा विक्रम मोडित काढला आहे.वैभव आता सर्वात कमी वयात भारतीय संघात निवड होण्याचा विक्रम केला आहे.या निवडीमुळे क्रिकेट वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. केवळ इंग्लंड-आयर्लंड दौराच नव्हे,तर जपानमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या एशियन गेम्स 2026 साठीही वैभवची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.या निवडीसह वैभव सूर्यवंशी भारतीय पुरुष क्रिकेट संघात स्थान मिळवणारा आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

< h2 style="text-align: justify;">

सचिनला टाकलं मागे !

मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरांनी १९८९ साली पाकिस्तान दौऱ्यात आपले आंतराष्ट्रिय पदार्पण केले होते.त्यावेळी सचिनचे वय १६ वर्ष १८१ दिवस होते. त्याने १६ वर्ष २०५ दिवसाच्या वयात आंतराष्ट्रिय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन इतिहास रचला होता.मात्र आता वैभवने हा विक्रम मोडीत काढला आहे.त्याने अवघ्या १५ वर्षाच्य व्यात भरतीय संघात प्रवेश केला आहे.

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

क्रिकेट चाहत्यांमध्ये 'बेबी बॉस' म्हणून लोकप्रिय असलेला वैभव आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. कमी वयात दाखवलेली परिपक्वता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी तो सज्ज झाला आहे.भारतीय संघात झालेली ही तरुण खेळाडूची निवड भविष्यातील मोठ्या बदलांचे संकेत मानली जात आहे. वैभव सूर्यवंशीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. एवढेच नाही तर त्याने आयपीएल इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >