नेमका प्रकार काय ?
भर उन्हात आणि ऐन कामाच्या वेळी वीज गायब होणे आता नित्याचेच झाले आहे. "लाईट का गेली?" आणि "ती कधी येईल?" असे साधे प्रश्न विचारण्यासाठी नागरिक जेव्हा महावितरण कार्यालयात जातात किंवा फोन करतात, तेव्हा त्यांना उद्धट उत्तरे दिली जातात किंवा चक्क टाळाटाळ केली जाते. तक्रार निवारण केंद्रावर फोन उचलला जात नाही आणि कार्यालयात गेल्यास अधिकारी आपल्या खुर्चीचा माज दाखवत जनतेला ताटकळत ठेवतात.’भीक नको, पण कुत्रं आवर’
अशी स्थितीशहरातील अनेक भागांत तासोतास वीज नसल्याने उद्योगधंदे ठप्प झाले आहेत, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचेही नुकसान होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उपकरणांचेही नुकसान होत आहे. तक्रार करायला गेलेल्या नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने, "महावितरणाकडून सवलत नको, पण किमान वीज तरी नीट द्या" म्हणजेच "भीक नको पण कुत्रं आवर" अशी म्हणण्याची वेळ आता त्रस्त चाळीसगावकरांवर आली आहे.
Crime News : बॉडी बनवण्याच्या नादात तरुणांच्या जीवाशी खेळ; गुंगीकारक इंजेक्शनचे रॅकेट उघड
पाथर्डी : शरीरसौष्ठवाच्या (Bodybuilding) नादात जिममध्ये जाणाऱ्या तरुणांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयित रॅकेटचा पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) पर्दाफाश केला ...
प्रशासकीय ढिम्मपणाचा कळस
एकीकडे सरकार दर्जेदार वीज पुरवठ्याचा दावा करत असताना, चाळीसगाव महावितरण मात्र या दाव्याला हरताळ फासत आहे. वीज देयके वसुलीसाठी तत्पर असणारे हे विभाग सेवा देताना मात्र पूर्णपणे 'ढिंब' झाले आहेत. या मग्रूर अधिकाऱ्यांना वरिष्ठांचा वचक उरला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर लवकरच यात सुधारणा झाली नाही, तर संतप्त नागरिक महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.ना लोकप्रतिनिधींचा धाक, ना वरिष्ठांचा वचक; महावितरणचे अधिकारी बेकाबू!
चाळीसगाव महावितरणमधील सध्याची अनागोंदी पाहता, येथे ‘राजा उतावीळ आणि प्रधान प्रधानाचा’ अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. या मस्तवाल अधिकाऱ्यांवर ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा वचक राहिला आहे, ना वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश! सामान्य जनता उन्हातान्हात विजेविना तडफडत असताना, लोकप्रतिनिधींनी यावर कायमची चपराक का लगावली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.बिल वसुलीच्या नावाखाली सर्वसामान्यांची वीज तत्परतेने कापणारे हे अधिकारी स्वतःच्या कर्तव्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादामुळेच या अधिकाऱ्यांची मग्रुरी वाढली आहे का, अशी शंका घेण्यास आता वाव आहे. लोकप्रतिनिधींनी जर या बेकाबू झालेल्या अधिकाऱ्यांचे लगाम तात्काळ ओढले नाहीत, तर महावितरणच्या या उफराट्या कारभाराचा फटका आगामी काळात येथील राजकारण्यांनाही बसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की!
Nashik News : नाशिकचा आणखी एक भामटा ज्योतिषी समोर, ‘ज्योतिषा’चे थेट दुबई कनेक्शन ?
Nashik News : नाशिक पोलिसांच्या रडारवर सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सचिन देशमुख! स्वतःला ज्योतिषी म्हणवणारा, हनुमान भक्त असल्याचा दावा करणारा हा व्यक्ती ...






