Kangana Ranaut : मराठी कलाकार आणि रंगभूमीचे कंगनाकडून भरभरून कौतुक; म्हणाली, '२० वर्षांत पहिल्यांदाच...'

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चित चित्रपट 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhhagya Viddhaata) १२ जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच (Trailer Launch) कार्यक्रमात कंगनाने मराठी कलाकार आणि मराठी रंगभूमीबद्दल विशेष भावना व्यक्त करत भरभरून कौतुक केले.


कंगना रणौत म्हणाली, “महाराष्ट्रात राहून मला २० वर्षे झाली आहेत. मात्र, मराठी कलाकारांसोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मला प्रथमच मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी खूप खास ठरला. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी किती समृद्ध आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.”



या चित्रपटात कंगनासोबत मराठी अभिनेत्री गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते आणि ईशा डे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ट्रेलर लाँचदरम्यान (Trailer Launch) कंगनाने गिरीजा ओक (Girija Oak) आणि स्मिता तांबे (Smita Tambe) यांचे विशेष आभार मानले. ती म्हणाली, “पात्राचे उच्चार, बोलण्याची शैली आणि येथील जीवनशैली समजून घेण्यासाठी स्मिता आणि गिरीजा यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे आमच्यातील केमिस्ट्री अधिक नैसर्गिक आणि प्रभावी दिसून आली आहे.” कंगनाने पुढे सांगितले की, चित्रपटात महिला मैत्री, कुटुंबासाठीची बांधिलकी आणि देशाप्रती असलेली निष्ठा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. “प्रेक्षकांना या महिलांची ताकद, समर्पण आणि संघर्ष नक्कीच भावेल,” असेही ती म्हणाली.




 

'भारत भाग्य विधाता'च्या ट्रेलरमध्ये कंगना एका परिचारिकेच्या भूमिकेत दिसत आहे. सुरुवातीला तिच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी ती धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर शेकडो लोकांचे प्राण वाचवते. एका सामान्य परिचारिकेचा असामान्य नायिकेमध्ये झालेला प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. खरे नायक स्वतःची जाहिरात करत नाहीत, तर गरज पडल्यावर पुढे येऊन आपले कर्तव्य बजावतात, हा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट १२ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

एकता कपूर : एकता कपूरचा सलमान खानला सडेतोड टोला ? म्हणाली- "जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी प्रत्येक भागात..."

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यात सोशल मीडियावर एक

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक

Sunny Deol Batwara 1947 : 'बटवारा १९४७' च्या प्रदर्शनाआधी सनी देओल नतमस्तक; मुलगा करणसोबत घेतले गुरु गोविंद सिंग यांचे आशीर्वाद!

पटना : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बटवारा १९४७' (Batwara 1947) मुळे सध्या

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो