Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती मध्ये केली .: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान त्याच्या हटके सिनेमांसोबतच खाजगी आयुष्यातील निर्णयांसाठी नेहमी चर्चेत असतो आता त्या मध्ये अजून एका ची भर पडली ती म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी लग्नाचा निर्यय घेतल्यामुळे अजूनच चर्चेला उगम आलं आहे. गेली काही वर्षे ज्या एका गोष्टीवरून सोशल मीडियावर गॉसिप सुरू होत.त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.



कधी आहे लग्न ?


येत्या ५ जुलै २०२५ ला आमीर खान आणि गौरी स्प्रॅट ह्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे . आमीर खान च्या बांद्रा येथील निवास्थानी कोर्ट मॅरेज करणार आहेत . अत्यंत सध्या पद्धतीने आणि दोन्ही कुटुंबातील काही मोजकी मंडळी आणि जवळचे मित्र परिवार ह्यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर ची होणारी बायको हि मुळची बंगळुरूची आहे. ४६ वर्षीय गौरी स्प्रॅट ही ब्युटी, फॅशन आणि वेलनेस क्षेत्रातील एक यशस्वी बिझनेसवुमन आहे . गौरीचं ह्या आधी एक लग्न झालं आहे आणि ६ वर्षाची तिला मुलगी सुद्धा आहे . अमिर खान आणि गौरी ह्याची ओळख हि फार जुनी आहे पण मध्ये काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले होते त्यामुळे खूप काळ ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते .पण दोन वर्षांपूर्वी आमिरची चुलत बहीण नुझहत हिच्या मध्यस्थीने हे दोघे पुन्हा एकत्र आले. आधी मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि २०२५ च्या ६० व्या वाढदिवसा दिवशी अमिर ने गौरी ला जगासमोर आणलं.




"गौरीला भेटल्यापासून मी...", अमिर म्हणाला

गौरी माझ्या आयुष्यात आल्या पासून माझं आयुष्य सकारात्मक पद्धतीने बदलत जात आहे असे आमिर ने भावनिक स्वरूपात सांगितले. एका मुलाखतीति तो म्हणाला, "मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला गौरीसारखी एक गोड आणि समजूतदार जोडीदार मिळाली." आमीर पुढे म्हणाला, "तिच्या सहवासात मला खरं कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता मिळते.रीना दत्ता आणि किरण राव ह्यांच्या सोबत पण माझं चांगलं चालू होत पण असत ना कि काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या मग तिथे राहण्यात काही अर्थ नसतो म्हणून मी वेगळा झालो .पण आता गौरी माझ्या आयुष्यात आल्यावर मला असं वाटतंय की, आता कुठे मी पूर्ण झालोय."


आमिर खान ने घेतलेल्या ह्या निर्णयाला त्याच्या चाहत्याने साकाराम्तक प्रतिसाथ दिला आहे.

Comments
Add Comment

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या