Friday, June 5, 2026

Buldhana Crime : शिर नसलेलं धड बघून सगळेच हादरले; शिवानी कळमेकर प्रकरणात नवे वळण

Buldhana Crime : शिर नसलेलं धड बघून सगळेच हादरले; शिवानी कळमेकर प्रकरणात नवे वळण

बुलढाणा : मागील महिन्यात शिवानी कळमेकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होत. भावाने आणि बापाने आपल्या मुलीचं शिर कापून अत्यंत क्रूरपणे जीव घेतल्याच्या घटनेची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी आरोपी भावाला आणि बापाला जवळपास २५ दिवस पोलीस कोठडीत ठेवले. पण आता एक अनपेक्षित आणि धक्कादायक अशी घटना घडली आहे. पोलीस ज्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समजते होते ती मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात आली. मुलीने जिवंत असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे पोलीस चक्रावले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे ?

बुलढाणा येथील राजुरा धरण परिसरात अर्धवट जळालेला आणि शिर नसलेल्या तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.त्याच दरम्यान घरातून बेपत्ता झालेली शिवानी कळमेकर अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंद होती. मिळालेला मृतदेह हा शिवानीचाच असल्याचं समजून पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली. जवळजवळ २५ दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. पण तिने पोलीस ठाण्यात जाऊन आपण जिवंत असल्याचं सांगितलं.

ज्या खुनाच्या आरोपात पोलिसांनी शिवानी कळमेकर च्या भावला आणि वडिलांना अटक केली होती तो खून झालाच नाही असं समजल्यावर पोलिसांनी त्या दोघांना सोडून दिलं. पण पोलिसांसमोर आता एक मोठा प्रश्न उभा आहे तो म्हणजे शिर नसलेलं धड आहे कोणाचं ? यासाठी पोलिसांनी AI तंत्राचा वापर करून धडाची ठेवण बघून तरुणीचा चेहरा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो सार्वजनिक करून पोलिसांनी नागरिकांना माहिती असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ५० हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे. अद्याप पोलिसांना कोणाकडूनही माहिती मिळालेली नाही. मात्र शिवानीच्या भावाला आणि वडिलांना विनाकारण अटक करून त्रास दिल्याप्रकरणी एका पीएसआयसह तीन पोलिसांना वरिष्ठांनी निलंबित केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा