बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील एका सदस्याने शपथविधी होऊन काही तास उलटत नाहीत तोच राजीनामा दिला आहे. मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार करत आहेत.
खासदार नारायण राणे; त्याला फार 'सिरियसली' घेऊ नका मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीतून उबाठा गटाचे ...
खातेवाटपाच्या मुद्यावरून नाराज झालेल्या रामलिंगा रेड्डी यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आता मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार रामलिंगा रेड्डी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री प्रियांक खर्गे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले आहे.
३४ वारसांना ३ कोटी ४० लाख मंजूर; विविध आंदोलनांत ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील ...
सरकारच्या स्थापनेला अजून जास्त काळ झालेला नाही. काही मतभेदाचे मुद्दे असल्यास चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. आवश्यकता भासल्यास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मदतीने चर्चा करून तोडगा काढता येईल, असे मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले. सरकार आणि संघटनेवर परिणाम होऊ नये यासाठी चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी भाजपमधील सर्व पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा भाजपच्या राष्ट्रीय ...
रामलिंगा रेड्डींच्या संतापाचे कारण
कर्नाटकमधील नव्या सरकारमध्ये रामलिंगा रेड्डी यांना जलसंपदा विभाग देण्यात आला. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हे खातेपाटप केले आहे. पण मिळालेल्या खात्याबाबत रामलिंगा रेड्डी नाराज आहेत. त्यांना बंगळुर विकास विभागाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नव्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले त्याचवेळी रामलिंगा रेड्डी यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. पण ते एकदम राजीनामा देतील असे कोणालाही वाटले नव्हते. आता रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम. मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ...
...म्हणून मुख्यमंत्री बदलण्यात आले
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढू लागल्याचे पाहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेअंती डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. पक्ष नेत्यांचे आदेश आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमत झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळनेतेपदी एकमताने निवड झाली. नंतर शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवकुमार यांना बुधवार ३ जून २०२६ रोजी संध्याकाळी शपथविधी देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. यानंतर जाहीर केलेल्या सरकारी कार्यक्रमानुसार डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सत्ता स्थापनेत साधले संतुलन
कर्नाटकमधील डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये वोक्कालिगा, दलित, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांना प्रतिनिधित्व देत सामाजिक संतुलन साधल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः वोक्कालिगा समुदायाचे आहेत, तर उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे दलित आहेत; ही माहिती पण काँग्रेसकडून देण्यात आली.
डॉ. जी. परमेश्वरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खर्गे, यूटी खादर, ईश्वर खांद्रे, यतींद्रामा पाटील आणि सुदरेश पाटील यांनीही कर्नाटक सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे एकूण एक हजार ४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून आंध्र प्रदेशच्या एन. चंद्राबाबू नायडू यांचे नाव येते, त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर टीव्हीकेचे संस्थापक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आहेत, त्यांच्याकडे ६४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
उत्तम व्यावसायिक डी. के. शिवकुमार
डी. के. शिवकुमार हे १९८९ पासून सलग आठ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. कर्नाटकमधील कनकपुरा मतदारसंघावर त्यांची उत्तम पकड आहे. कनकपुराचे रॉकस्टार किंवा कनकपुरा बांदा या नावांनीही ते ओळखले जातात. राजकारणी असण्याव्यतिरिक्त ते उत्तम व्यावसायिक आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाचे संकटमोचक असेही म्हणतात.






