Pune Toxic Liquor Case : पुणे विषारी दारू प्रकरणात CIDची मोठी कारवाई; रसायन पुरवठादार पिता-पुत्र जेरबंद

पुणे : दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात (Pune Toxic Liquor Case) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मोठी कारवाई करत दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य संशयित पिता-पुत्राला अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणा वेगाने पावले टाकत आहे.


सीआयडीच्या पुणे पथकाने नवी मुंबईतील वाशी गावात छापा टाकून अरुण जगदंब चौबे (वय ५९) आणि अभिषेक अरुण चौबे (वय ३४) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune Toxic Liquor Case)



नेमकं प्रकरण काय ?


पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी विषारी हातभट्टीची दारू सेवन (Pune Toxic Liquor Case) केल्यानंतर भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मृतांच्या कुटुंबीयांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत असताना सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.


तपास हाती घेतल्यानंतर सीआयडीने दहा विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि इतर संबंधित भागांमध्ये व्यापक शोधमोहीम राबवून पुरावे गोळा केले आहेत. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहारांची माहिती, दारूचे नमुने आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. (Pune Toxic Liquor Case)


जप्त करण्यात आलेले दारूचे नमुने आणि रासायनिक पदार्थ न्यायवैद्यक तपासणीसाठी पुण्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात दारूमध्ये जीवघेणे रासायनिक घटक मिसळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याबाबतचा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. (Pune Toxic Liquor Case)



सीआयडी आता या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे. विषारी रसायनांचा मूळ स्रोत, त्यांची खरेदी-विक्री, वाहतूक आणि हातभट्टी दारू निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याची साखळी याचा तपास सुरू आहे. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. (Pune Toxic Liquor Case)


तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असून या प्रकरणातून मोठे अवैध दारू रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या दुर्घटनेमुळे राज्यातील बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा प्रकारच्या कारवायांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Pune Toxic Liquor Case)

Comments
Add Comment

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! १२ ऑगस्टला 'या' गाड्या रद्द, अनेकांचा मार्ग बदलला

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याने नाराजी मुंबई : बीड दौऱ्यादरम्यान