Pune: पुणे शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात घायवळ गँगचा म्होरक्या गुंडा सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेला सचिन घायवळ पोलिसांना चकवा देण्यासाठी नाव बदलून आणि वेशांतर करून राहत होता. मात्र, गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला ओळखूण बेढ्या घातल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ हा कुख्यात गुंडा निलेश घायवळाचा भाऊ आहे. पुण्यातील संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. कोथरूड परिसरातील अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. तो राजस्थानमध्ये लपून बसलेल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुणे पोलीसांचा सर्वात मोठा कामगिरी मानलाी जात आहे.
Nashik : दिंडोरी ( Dindori ) तालुक्यातील कौडासर (Kaudasar) येथे अवकाळी पावसादरम्यान ११ केव्ही वीजवाहक तार तुटून शेतात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू ...
11 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी
सचिन घायवळविरोधात खंडणी, अपहरण, जबरी मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी टोळी चालवणे यांसारखे तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये कोथरूड गोळीबार प्रकरण आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाईचाही समावेश आहे. त्यामुळे त्याची अटक ही पुणे पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. पुणे पोलिसांनी घायवळला अटक करीत त्याच्या अर्थिक व्यवहार आणि गुणेघारीचा तपास सुरु केला आहे. त्याचे काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचे मानले जात आहे. या चौकशीतून घायवळ गँगच्या इतर कारवाया, आर्थिक व्यवहार आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.






