Pune Nasrapur Girl Death Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तीन प्रत्यक्षदर्शी चिमुकल्यांची महत्त्वाची साक्ष!

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या धक्कादायक प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपीला पीडित चिमुकलीसोबत पाहिलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे साक्ष (Witness) दिली आहे. या मुलांची साक्ष प्रकरणाच्या सुनावणीत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात घेण्यात आलेल्या ओळख परेडीदरम्यान तसेच न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) हजर करण्यात आलेल्या आरोपीची तिन्ही मुलांनी अचूक ओळख पटवली. विशेष म्हणजे, या मुलांनी यापूर्वीही न्यायालयासमोर आपले जबाब नोंदवले होते.



गोठ्याच्या फटीतून आरोपीला पाहिलं


घटनेच्या दिवशी ही तिन्ही मुलं परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने त्यांना तेथून जाण्यास सांगितले होते. मात्र आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने मुलांनी गोठ्याजवळील पत्र्याच्या शेडकडे लक्ष ठेवले. आरोपी पीडित मुलीला गोठ्याशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर मुलांनी गोठ्याच्या फटीतून आत डोकावून पाहिले असता आरोपी त्यांना दिसला. त्यांनी न्यायालयासमोर हा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला आहे.


मुलांनी पाहिलं म्हणून आरोपीने केली दगडफेक


मुलांनी आपल्याला पाहिल्याचे लक्षात येताच आरोपी संतापला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. आरोपीच्या भीतीने ही मुलं तेथून पळून गेली. न्यायालयात साक्ष देताना त्यांनी हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे सांगितला. या तिन्ही प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष सरकार पक्षासाठी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.



८२ साक्षीदारांची यादी; १६ जणांची साक्ष नोंद


या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे. त्यापैकी आतापर्यंत १६ साक्षीदारांच्या साक्षी विशेष सरकारी वकिलांनी नोंदवून घेतल्या आहेत. पुढील सुनावण्यांमध्ये आणखी साक्षीदारांची साक्ष होणार आहे.


नेमकं काय घडलं होतं?


पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. आरोपीनं घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला 'वासरू दाखवतो' असे सांगत हात धरून गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता. दुपारनंतर मुलगी दिसत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती गोठ्यात मतावस्थेत आढळून आली आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.


सीसीटीव्ही फुटेजमुळे (CCTV Footage) उघडकीस आला गुन्हा


घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी पीडित मुलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि आरोपीला अटक करण्यात आली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजीकडे आलेल्या निष्पाप चिमुकलीसोबत अशी घटना घडल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सीसीटीव्हीतील दृश्ये समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले.



ग्रामस्थांचा संताप; आरोपीबाबत धक्कादायक माहिती


या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र इतके गंभीर कृत्य करूनही आरोपीने आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचा दावा केला. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला त्याच्यावरील गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, ही केवळ मारामारीची किरकोळ केस असल्याचे उत्तर त्याने दिल्याची माहिती समोर आली. त्याच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.


दरम्यान, आरोपीविरोधात यापूर्वीही दोन गंभीर प्रकरणे दाखल झाली होती. मात्र पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला होता. त्यामुळे या प्रकरणात तरी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांसह विविध स्तरांतून केली जात आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून प्रत्यक्षदर्शी मुलांनी दिलेली साक्ष, ओळख परेड आणि इतर पुरावे (Evidences) न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले असून पीडितेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery 2026 : आनंदवार्ता! आता घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाची ५ हजार घरांची मेगा लॉटरी लवकरच

- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी

Nashik Crime : नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं ?

Nashik Crime : पाऊस झाल्यानंतर नाशिकमधील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना

Ind vs Eng : रोहित-विराट पहिल्या सामन्यासाठी सज्ज ! एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं इंग्लंडवर वर्चस्व

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आज (१४ जुलै) पासून सुरू होत असून, पहिला सामना

Jalgaon Crime : जराही दया आली नाही, सासूने अंध महिलेला तिच्या साडेतीन वर्षांच्या अंध मुलासह विहिरीत दिले ढकलून ; कटातही पतीचाही सहभाग असल्याचा आरोप

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पोलिसांना शेतात

IND vs ENG ODI : इंग्लंडचा मोठा डाव! सलामीची जोडी पुन्हा बदलली; भारताविरुद्ध तीन फिरकीपटूंवर मोठा विश्वास

मुंबई : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या अंतिम ११

FIFA World Cup 2026 : गोल, ग्लॅमर आणि अब्जावधींची कमाई! मेस्सीपासून एम्बाप्पेपर्यंत सुपरस्टार्सच्या प्रेमकथा आणि संपत्तीची चर्चा

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघांनी उपांत्य