Sewage treatment plant in Mahul : माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद?

- तब्बल दहा दशलक्ष लिटर मलजलावर केली जाते प्रक्रिया


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आयुर्मान संपुष्टात आले असून एका बाजुला पर्यावरण पुरक बाबींकडे लक्ष देणाऱ्या महापालिकेला या वसाहतीतील या प्रकल्पाकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. मागील ३ वर्षांपासून या प्रकल्पाची योग्यप्रकारे देखभाल केली जात नसल्यामुळे या प्रकल्पातील सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नाही. (Sewage treatment plant in Mahul)


मुंबई महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरणाअंतर्गत चेंबूरमधील माहुल गावात एव्हरस्माईल कंस्ट्रक्शन कंपनीने निवासी संकुल विकसित केले आहे. या कंपनीने सन २०१२मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधून या सदनिका महापालिकेच्या मालमत्ता विभागाला हस्तांतरीत केल्या. यामध्ये विभाग कार्यालये, तानसा पाईप लाईन लगतच्या झोपड्या तसेच ब्रिमस्टोवॅड प्रकल्पग्रस्त आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. या वसाहतीमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सन २०१२मध्ये १०.३ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु यासाठी देखभाल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटाचा कालावधी हा ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे देखभालीचे कंत्राट संपुष्टात आल्यांनतर अद्यापही याठिकाणी नवीन संस्थेची निवड करण्यात न आल्यामुळे सध्या हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नाही. (Sewage treatment plant in Mahul)



मलनि:सारण प्रचालन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रक्रिया केंद्रातील बार स्क्रीन, मलजल उपसा करणारे पंप, प्रक्रिया केलेल्या पाण्याचे पंप, विद्युत नियंत्रण् पॅनल इत्यादी यांत्रिकी व विद्युत उपकरणे खराब होत आहे.तसेच सांडपाण्यावर सुरळीत प्रक्रिया होण्यासाठी या उपकरणांच्या नुतनीकरणाची आवश्यकता आहे. तसेच परिसरात बसवलेली यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी वेदर शेड आणि संरक्षण भिंतीेच काम करणे गरजेचे आहे. (Sewage treatment plant in Mahul)


या प्रकल्पातील प्रक्रिया करण्या येणऱ्या दहा दशलक्ष लिटर पाण्यापैंकी ६ दलशक्ष लिटर पाण्याचा पुरवठा एचपीसीएल रिफायनरीला करण्यात येत आहे. यातून महापालिकेला वर्षांला सुमारे ३५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. (Sewage treatment plant in Mahul)



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता या प्रक्रिया केंद्राचे नुतनीकरण आणि पुढील पाच वर्षांच्या देखभालीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून संबधित संस्थेची निवड झाल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात केले जाईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Sewage treatment plant in Mahul)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून