स्वयंसेवी संस्था, स्थानिक गट, कार्पोरेट कंपन्यांचा सहभागाने मुंबईचा विकासासाठी डिजिटल व्यासपीठ
मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकास कामे आता खासगी संस्थांच्या माध्यमातून तसेच सीएसआर निधीतून करण्यावर भर देणार आहे. यासाठी आता नागरिकांना सक्रियपणे सहभाग नोंदवता यावा यसाठी पार्टीसिपेट मुंबई (Participate Mumbai) या उपक्रमाची संकल्पना साकारली जात आहे. या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरी स्वयंसेवी संस्था, स्थानिक गट आणि कार्पोरेट क्षेत्र यांना एक आणणारे एक व्यापक, एकात्मिक आणि उद्देशपूर्ण डिजिटल (Digital) व्यासपीठ विकसित करण्यात येत आहे.
समाजकल्याणासाठी योगदान देण्याची तयारी असलेल्या अनेक व्यक्तींना शहरातील नेमक्या कोणत्या समस्या तातडीच्या आहेत, त्यात आपण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो किंवा आपल्या कौशल्ये, वेळ व संसाधनांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सुस्पष्ट दिशा उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर, पार्टिसिपेट मुंबई नागरिकांना त्यांच्या आवडी, कौशल्ये आणि उपलब्धतेनुसार विविध सामाजिक उपक्रमांमध्ये - जसे की स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, जनजागृती उपक्रम इत्यादी सहभाग नोंदविण्याची सुलभसंधी उपलब्ध करून देईल. हे व्यासपीठ केवळ स्वयंसेवा पुरते मर्यादित न राहता, सामाजिक योगदान उपक्रम, आवश्यक वस्तूंचे संकलन, तसेच महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती मोहिमा राबविण्यासाठीही एक प्रभावी माध्यम ठरेल.
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ मध्ये (Norway Chess Tournament Praggnanandh) आणखी एक संस्मरणीय कामगिरी केली. त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल ...
एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व उपक्रम, गरजा, स्वयंसेवक (Volunteers) आणि प्रगती यांची माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन सर्व घटकांमध्ये विश्वास निर्माण होईल. रिअल-टाइम मॉनिटरिंग व अहवाल प्रणालीमुळे नागरिक व दाते त्यांच्या योगदानाचा प्रत्यक्ष परिणाम पाहू शकतील,
संबंधित विभाग आपल्या गरजा, प्रकल्प प्रस्ताव व आवश्यकतेचे तपशील पार्टिसिपेट मुंबई च्या अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) अपलोड (Upload) करतील, ज्यामुळे ही माहिती सर्व नागरिक, स्वयंसेवी गट व सीएसआर (CSR) उपक्रमाच्या अंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांना सहजपणे उपलब्ध होईल. त्यानंतर इच्छुक स्वयंसेवक गट किंवा कॉर्पोरेट संस्था संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागासाठी आपली स्वारस्य नोंदवतील.
पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर मंगळवारी रात्री झालेल्या ...
उपक्रमासाठी महापालिकेच्यावतीने कामकाज करण्याकरता तांत्रिक सल्लागार म्हणून तांत्रिक व्यवस्थापन सल्लागार म्हणून अर्नस्ट अँड यंग एलएलपी या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.






