इराण (Iran) आणि अमेरिकेदरम्यान (America) झालेल्या सीझफायरनंतर पुन्हा एकदा पश्चिम आशियात तणाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी पहाटे इराणकडून कुवेत (Kuwait) आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात विमानतळाच्या टर्मिनल-१ इमारतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. (Kuwait International Airport Hit By Drone Attack)
कुवेतच्या संरक्षण दलांनी आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेनंतर तातडीने आपत्कालीन योजना लागू केली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली. काही विमानांचे मार्ग बदलून त्यांना अन्य विमानतळांकडे वळवण्यात आले. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्याची पुष्टी करत याला गंभीर स्वरूपाचे आक्रमण म्हटले आहे. हल्ल्यानंतर बचाव पथके आणि वैद्यकीय कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे.
सोन्याच्या दरात घसरण; भाव १ लाखांच्या खाली येणार? तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या (Gold Rate) दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोन्याच्या ...
दरम्यान, अमेरिकन लष्कराने इराणकडून डागण्यात आलेली काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. तसेच आत्मसंरक्षणाच्या भूमिकेतून इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर कारवाई करण्यात आल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. या घटनेचे व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे सीझफायरनंतर निर्माण झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली असून पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे देशभरात पुन्हा चिंतेची लाट पसरली आहे.






