Nashik News : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर नाशिक पोलिसांना जाग, चार दिवसांत ३२ जणांना बेड्या

Nashik News : पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारुमुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या विषारी दारूमुळे आतापर्यंत २४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक बाधितांवर अजूनही विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहेत. तर अनेक पोलिसांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. (Pune Poisonous Liquor Case)



५२ गुन्हे दाखल, ३२ संशयित ताब्यात


दरम्यान पुण्याच्या या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणानंतर नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभाग ( Excise Department) आणि पोलिस (police) अँ क्शन मोडवर असल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये (Nashik ) गेल्या चार दिवसांत अवैध दारू धंद्यांवर धडक कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. २८ ते ३१ मे या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) ५२ गुन्हे दाखल करत ३२ संशयितांची धरपकड केली आहे. संपूर्ण मे महिन्यात झालेल्या एकूण कारवायांपैकी तब्बल १५ टक्के कारवाया या केवळ गेल्या चार दिवसांतील आहेत.



झोपलेली प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी


यावरून पुणे प्रकरणानंतर (Pune Poisonous Liquor Case) नाशिकची झोपलेली प्रशासकीय यंत्रणा कशी खडबडून जागी झाली हे दिसून येते. पुण्याच्या घटनेनंतर नाशिकचे विभागीय आणि भरारी पथक तातडीने रस्त्यावर उतरली आहेत. घोटी, कळवण आणि इगतपुरी (Igatpuri) या तालुक्यांमध्ये (Taluka) अवैध दारूचे मोठे जाळे असल्याचे समोर आले असून, येथे सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. संशयितांची घरे, शेतातील शेड, नदीकाठचे भाग आणि हायवेवरील ढाबे, हॉटेल्स व खानावळींवर मध्यरात्री छापे टाकण्यात आले. मे महिन्यात विभागाने एकूण ३५८ गुन्हे दाखल करून ३८० जणांना अटक (Arrested) केली असून, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ वाहनेही जप्त केली आहेत.



गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त


केवळ उत्पादन शुल्कच नव्हे, तर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीसही या मोहिमेत मागे नाहीत. निलंबनाच्या भीतीने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. २९ आणि ३० मे या दोनच दिवसांत शहर पोलिसांनी १२, तर ग्रामीण पोलिसांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती