POP's Immersed Idols : पीओपीच्या विसर्जित मूर्तींवर पर्यावरणपुरक प्रक्रिया

- महापालिकेच्यावतीने १० टन वजनी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या अवशेषांचे पर्यावरण पुरक वैद्यानिक पध्दतीने विघटन करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार पीओपीच्या मूर्तींच्या अवशेषांचे विघटन करण्यासाठी सुमारे १० टन वजनी विसर्जित मुर्तींवर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी अकर्मा फाऊंडेशन या संस्थेची निवडकरण्यात आली आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून नाशिक येथे ३५० टन पेक्षा अधिक पीओपी गणेश मूर्तींवर प्रक्रिया केली जात आहे. (POP's Immersed Idols)



मुंबई उच्च न्यायालय यांच्या जनहित याचिकेच्या निर्देशानुसार २४ जुलै २०२५ विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन तातडीने करणे पर्यावरणदृष्ट्‌या आवश्यक आहे. तसेच पीओपी मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपीचा पुर्नवापर आणि पुर्नवापर करण्याच्या बाबी सुचवण्यासाठी राज्य सरकार एक तज्ज्ञ वैज्ञानिक समिती नियुक्त करेल. पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने जलद विरघळवण्याच्या वैज्ञानिक पद्धतींचाही तज्ञ समिती अभ्यास करेल. तज्ञ वैज्ञानिक समिती मार्फत अद्यापी मार्गदर्शक तत्वे प्राप्त झाली नसत्यामुळे एकूण मूर्ती अवशेष साहित्यापैकी सुमारे १० टन वजनी विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया पुर्नवापर उत्पादन प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचे प्रस्ताविण्यात आले असल्याचे पर्यावरण विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (POP's Immersed Idols)



सेवा भावी संस्था अकर्मा फाऊंडेशन यांना याप्रकारे विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन प्रकल्प करण्याचा अनुभव आहे. नाशिक येथे त्यांचे प्रक्रिया केंद्र आहे. तेथे त्यांनी आतापर्यंत वजनी ३५० टन पेक्षा जास्त मूर्तींवर याप्रकारे प्रक्रिया केली आहे. अकर्मा फाऊंडेशन यांनी विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन कसे केले जाते याचे सादरीकरण अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या दालनात दिले. हे काम पार पाडण्याचा अनुभव असल्यामुळे एकूण मूर्ती अवशेष साहित्यापैकी सुमारे १० टन वजनी साहित्याचे काम प्रायोगिक प्रकल्प तत्वावर करण्याचे आदेश अति. आयुक्त (शहर) यांच्या मंजुरीनुसार देण्यात आले असल्याचेही पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे. यासाठी सुमारे २० लाख ४४ हजार रुपये या प्रायोगिक तत्वावर प्रकल्पासाठी खर्च केले जाणार आहेत. (POP's Immersed Idols)


Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)