Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित


नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजन


नागरिक नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना



मुंबई : नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटन/धार्मिक भेटीच्या अनुषंगाने गेलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या महापूराच्या घटनेचा या समूहातील नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती घेतली जात आहे.नागपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज येथे सुरक्षितपणे वास्तव्यास असून, नेपाळ प्रशासनाकडून देखील त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.



या नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजित बसऐवजी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार हे नागरिक २७ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू येथून जनकपूर, नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना झाले असून, २८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेपर्यंत जनकपूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यानंतर जनकपूर येथून भारतात प्रवेश करून पुढे पटना येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. पटना येथून दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरकडे येण्यासाठी त्यांची रेल्वेगाडी नियोजित आहे. त्यानुसार या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे नागपूर येथे परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



नागरिकांच्या नागपूर येथील नातेवाईकांशीही जिल्हा प्रशासनाचा संपर्क असून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार समूहातील सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अंकुश लुडेकर, रा. प्रेमनगर, इतवारी, नागपूर व आशितोष चौधरी, रा. मानेवाडा, नागपूर हे दोन नातेवाईक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. नेपाळमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाबाबतही जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध

Nitesh Rane : फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार (फिश मार्केट) स्थापनेसाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त