BMC News : येत्या १० जूनपासून नोंदणीकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र

- उपमहापौर संजय घाडी, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांसंदर्भात आयुक्तांची भेट


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


येत्या १० जून २०२६ पासून प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये ९९,४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू. आर.कोड असलेले ओळखपत्र देण्यात येईल. तसेच लवकरात लवकर टाऊन वेंडिंग समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टाऊन वेंडिंग समितीचे काम सुरू होईल असे प्रशासनाच्यावतीने आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेनेचे नेते संजय घाडी यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (BMC News)


मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत उपमहापौर संजय घाडी, शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपमसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, विधी समितीच्या अध्यक्षा दिक्षा कारकर व मुंबई शहरातील अधिकृत फेरीवाल्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. (BMC News)



आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये मुंबई शहरांमध्ये ९९,४३५ एवढे नोंदणीकृत फेरीवाले असून त्यांना क्यू.आर.कोड असलेले ओळखपत्र मुंबई महानगरपालिकेने त्वरित द्यावेत अशी मागणी केली.तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या २० ठिकाणी फेरीवाले बसवायचे नाहीत, ती २० ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी फेरीवाल्यांची फेरीवाला विभाग घोषित करून, तेथे त्यांना व्यवसाय करायला द्यावा अशी मागणी करण्यात आली. (BMC News)


तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार टाऊन वेंडिंग समिती गठित करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. याबाबत १० जून २०२६ पासून प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये ९९४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू. आर.कोड असलेले ओळखपत्र देण्यात येईल असे आयुक्तांनी घोषित केले. तसेच लवकरात लवकर टाऊन वेंडिंग समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार टाऊन वेंडिंग समितीचे काम सुरू होईल, असेही प्रशासनाने सांगितले,असेही घाडी आणि निरुपम यांनी सांगितले. (BMC News)



बांग्लादेशींवर कारवाई व्हायला हवी, पण...


मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असली तरी राजकीय नेत्यांच्या केवळ तक्रारीवरून कोणतीही कारवाई करू नये, पण जी कायदेशीर कारवाई करता येईल तेवढीच करावी अशाप्रकारे सांगत माजी खासदार संजय निरुपम यांनी सध्या सुरु असलेल्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांग्लादेशी मुस्लिमांवर कारवाई व्हायलाच हवी. पण ही कारवाई करताना आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये किती बांग्लादेशी आढळून आले याचीही माहिती दिली जावी. परंतु बांग्लादेशींच्या नावाखाली मराठी आणि उत्तर भारतीयांसह भारतीय नागरिक असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होते, हे योग्य नसल्याचीही रि निरुपम यांनी ओढली. (BMC News)

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)