Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे तब्बल ३.७५ लाख कोटी रुपये बुडाले

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला दमदार तेजीने सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात दिवसअखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम बाजारावर दिसून आला असून सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी २३,४०० च्या खाली घसरून बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३.७५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. (Share Market Crash)


अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष, तसेच पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही झाला. (Share Market Crash)



दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने सुरुवातीला चांगली कामगिरी करत ७५,३६७ अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांक घसरला आणि अखेरीस ५०८ अंकांच्या घसरणीसह ७४,२६७.३४ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकही २३,७३३ अंकांपर्यंत पोहोचल्यानंतर घसरला आणि १६५.१५ अंकांच्या तोट्यासह २३,३८३.६० अंकांवर स्थिरावला. (Share Market Crash)


बाजारातील या घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य एका दिवसात सुमारे ३.७४ लाख कोटी रुपयांनी घटले. मागील सत्रात सुमारे ४६४ लाख कोटी रुपये असलेले बाजारमूल्य घसरून ४६० लाख कोटी रुपयांवर आले. (Share Market Crash)


क्षेत्रनिहाय पाहता, आयटी क्षेत्राने बाजाराला काहीसा आधार देण्याचा प्रयत्न केला. टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. मात्र इतर बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. एफएमसीजी निर्देशांकात सुमारे २.५ टक्क्यांची घसरण झाली, तर ऑटो, पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्रात २ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. बँकिंग क्षेत्रातील निर्देशांकही जवळपास १ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Crash)



सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २४ कंपन्यांमध्ये घसरण झाली. एचयूएल, आयटीसी आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. (Share Market Crash)


दरम्यान, बीएसईवर एकूण ४,५४९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,५८९ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,७६१ शेअर्समध्ये घसरण झाली. यावरून बाजारातील नकारात्मक वातावरण स्पष्टपणे दिसून आले. (Share Market Crash)



तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर आगामी काही दिवसांत बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. (Share Market Crash)

Comments
Add Comment

Mumbai Tree Collapse : झाडांच्या मुळांभोवतीही असणार रस्ते अभियंत्याची नजर

महापालिकेने केले परिपत्रक जारी मुंबई : मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांमध्ये झाडे पडून झालेल्या दुघर्टनांची गंभीर

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Moshi Incident : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर; १७ जणांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी  : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर

Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत