Monday, June 1, 2026

Gold Rate Today : सोनं-चांदी स्वस्त! जूनच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

Gold Rate Today : सोनं-चांदी स्वस्त! जूनच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशभरातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर वाढल्याने ग्राहक आणि सराफा बाजारात मोठी चिंता व्यक्त केली जात होती. वाढलेले दर आता काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.   बाजारातील ताज्या दरांनुसार, नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर  १५७१८०  रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १४४०९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली असून २४ कॅरेट सोन्याचा दर १५७०३० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १४४९४० रुपये इतका आहे.   पुणे आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १५७०३० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १४३९५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत अधिक असून २४ कॅरेट सोन्याचा दर १५९५९० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १४६२९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे.  
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे २०२० रुपयांची घट झाली असून २२ कॅरेट सोन्याच्या दरात १८५० रुपयांची कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतींवर दबाव असल्याचे दिसून येत आहे.   तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर मजबूत होणे, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि जागतिक घडामोडींमधील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत असल्याने बाजारात चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या चांदीचा दर २७९९०० रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ५००० रुपयांची घट झाली असून त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >