MIDC : मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीत नोकरी

जिल्हाधिकाऱ्यांना वारसांच्या पडताळणीचे निर्देश; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी


मुंबई : मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आंदोलनातील मृतांच्या पात्र वारसांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने प्रक्रियेला गती देत, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीने कायदेशीर पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.



यापूर्वी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती. याच धर्तीवर आता 'एमआयडीसी'मध्येही मृत आंदोलकांच्या एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जाईल. राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना यासंदर्भात आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) या संदर्भातील विशेष परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहे.



सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, एमआयडीसीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी मृत आंदोलकांच्या वारसांची पडताळणी अत्यंत काटेकोर आणि अचूक असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मृतांच्या वारसांची तातडीने, गतिमान आणि योग्य ती शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर संपूर्ण चौकशी व तपासणी करून पात्र ठरलेल्या वारसांना अधिकृत प्रमाणपत्र वितरित करावे, जेणेकरून त्यांना एमआयडीसीमधील नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. ही सर्व प्रक्रिया विहित मुदतीत आणि प्राधान्याने राबवण्याच्या सूचनाही सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग